विविध मागण्यांसाठी राज्यातील वैद्यकीय सेवेतील चतुर्थ श्रेणी कर्मचारी २ दिवसांच्या संपावर !

कर्मचार्‍यांची जुनी निवृत्ती वेतन योजना पुन्हा लागू करावी, कर्मचार्‍यांच्या रिक्त जागा भरण्यात याव्यात, खासगीकरणाचे धोरण रहित करावे, अश्या मागण्या आंदोलकांनी केल्या आहेत.

अल्पसंख्यांक विकासमंत्री नवाब मलिक यांना अंमलबजावणी संचालनालयाकडून अटक !

अटकेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे आंदोलन !

आंदोलक झाडावर चढून आंदोलन करत असल्याने बीड प्रशासनाने ३ झाडे तोडली !

झाडावर चढून कुणी आंदोलन करू नये; म्हणून झाडच तोडणार्‍या प्रशासनाकडून नागरिकांच्या समस्या योग्य पद्धतीने सोडवण्याची अपेक्षा काय करणार ?

शिवजयंती साजरी करू न देणार्‍या डोंबिवली येथील महाविद्यालयाच्या प्रशासनाच्या विरोधात विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांची निदर्शने

पेंढारकर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना महाविद्यालयात शिवजयंती साजरी करण्यास दिली नाही. त्यामुळे निषेध करत विहिंप आणि बजरंग दल यांनी निदर्शने केली.

भारतात दंगलखोरांकडून हानी भरपाई वसूल करण्याला विरोध होतो, तर कॅनडामध्ये कोणत्याही योग्य प्रक्रियेविनाच गुन्हेगार ठरवले जाते! – विचारवंत ब्रह्म चेलानी

भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने एका राज्यातील अधिकार्‍यांना सार्वजनिक संपत्तीची हानी करणार्‍या दंगलखोरांना नोटीस मागे घेण्यास भाग पाडले. दुसरीकडे कॅनडामध्ये शांततापूर्ण आंदोलनाला योग्य प्रक्रियेविनाच गुन्हेगार ठरवले जाते.

नागपूर पोलिसांची हिंदुस्थानी भाऊ उपाख्य विकास पाठक यांना नोटीस !

चौकशीच्या वेळी आवश्यकता भासल्यास येथील पोलीस हिंदुस्थानी भाऊ यांना अटक करू शकतात.

कर्नाटकातील अल्पसंख्यांकांच्या शाळांमध्येही हिजाबवर बंदी ! – राज्य सरकारचा आदेश

शाळा आणि महाविद्यालये यांच्या वर्गांमध्ये भगवी शाल, स्कार्फ आणि हिजाब घालण्यास मनाई आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर उत्तरप्रदेश सरकारकडून दंगलखोरांकडून हानी भरपार्ई वसूल करण्याची प्रक्रिया रहित

सर्वोच्च न्यायालयाने वसुली रहित करण्याचा आदेश दिला. त्याच वेळी न्यायालयाने ‘सरकार नव्या कायद्यानुसार कारवाई करू शकते’, असेही म्हटले आहे.

आशासेविकांना ५ मास मानधन न मिळाल्यामुळे त्यांचा जिल्हा परिषदेवर लाटणे मोर्चा !

आशासेविकांना मानधनासाठी मोर्चा का काढावा लागतो ? प्रशासन स्वतःहून का लक्ष देत नाही ?

गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथे धर्मांधांकडून हिजाबच्या समर्थनार्थ विनाअनुमती आंदोलन करून पोलिसांशी असभ्य वर्तन

विनाअनुमती आंदोलन करण्याचे धर्मांधांचे पुन्हा धाडस होऊ नये, यासाठी त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे !