गोव्यामध्ये सोसायटी ‘डीम्ड कन्व्हेयन्स’ची (अभिहस्तांतरण प्रक्रियेची) अनुमती हवी !

सरकारने ‘डीम्ड कन्व्हेयन्स’ (अभिहस्तांतरण प्रक्रिया) कायदा संमत केल्यास जनतेचे आशीर्वाद सरकारला मिळतील; परंतु यासाठी सर्व सोसायट्यांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. ‘एकी हेच बळ’, या तत्त्वाने हा विषय नक्कीच सोडवता येईल.’

पोर्तुगीज नागरी कायदा (सिव्हिल कोड) – काही ठिकाणी त्रासदायक

गोव्यात भूमीशी संबंधित जे कायदे आहेत, त्यामध्ये कोणतीही सदनिका (फ्लॅट), भूमी, दुकान यांच्या मालकी संदर्भात निकष लावायचा असेल, तर येथील भूमीविषयक कायद्याप्रमाणे पती-पत्नी हे दोघे समान हक्काचे मालक असतात. वरवर जरी हे चांगले दिसत असले, तरीही यात आता पुष्कळ गोंधळ दिसून येत आहे

‘ड्रग्ज’विरोधी (अमली पदार्थविरोधी) कायदा आणि त्याविषयीचे विवरण !

सध्या समुद्रकिनार्‍यांवर ‘रेव्ह पार्ट्या’ होत असतात. या मेजवान्यांमध्ये मोठमोठी माणसे अडकलेली असतात. बॉलीवूड ते हॉलीवूड अशा सर्वच ठिकाणी असे प्रकार चालू असतात. ‘फॅशन’च्या नावाखाली बेकायदेशीर काही होऊ नये, यासाठी हा एवढा शब्द प्रपंच !

सायबर गुन्हे, तक्रार करण्याची पद्धत आणि त्याविषयी घ्यावयाची काळजी !

भारतामध्ये वर्ष २००० मध्ये ‘सायबर क्राईम कायदा’ पारित झाला आणि त्यानंतर वर्ष २००८ मध्ये त्यात काही पालट केले गेले. यात १ वर्षापासून आजन्म कारावास, तसेच १ लाख रुपये ते ५ लाख रुपयांपर्यंत दंड अशा शिक्षा नमूद केलेल्या आहेत.

जिवंत असतांनाच ‘उत्तराधिकारी प्रमाणपत्र (सक्सेशन सर्टिफिकेट)’ का मिळू नये ?

भारतीय कायद्यानुसार व्यक्ती जिवंत असतांना आणि तिच्या मृत्यूनंतर अनेक कायदेशीर कागदपत्रे सिद्ध केली जातात. यामध्ये तिच्या कुटुंबियांचा उल्लेख असतो.

‘युसुफ्रुकट’ हा शब्द ‘बक्षीसपत्रा’मध्ये अनिवार्य करा !

‘युसुफ्रुकट’ याचा अर्थ असा आहे की, हयात असेपर्यंत भूमी, घर यांचा उपभोग घेणे आणि त्यांच्या निधनानंतर जरी ‘सशर्त बक्षीसपत्र’ झाले असले, तरी रहाता येईल. थोडक्यात बक्षीसपत्र केलेली व्यक्ती ते झाल्यानंतर सुद्धा त्या घरात शेवटच्या श्वासापर्यंत राहू शकते.

गोव्यातील घटस्फोट कायद्यांमध्ये पालट अत्यावश्यक !

‘विवाह आणि घटस्फोट या दोन टोकाच्या गोष्टी आहेत. एकात जोडणे, तर एकात तोडणे अभिप्रेत असते. दोन्ही गोष्टी अत्यंत बेभरवशाच्या झालेल्या आहेत; कारण या दोन गोष्टींमधील अंतर ही अल्प होत चालले आहे.

‘मॅरेज रजिस्ट्रेशन’ (विवाह नोंदणी) – गोव्यात होणारी अडचण !

गोव्यात परराज्यांतील जन्मदाखला आणि विवाह प्रमाणपत्र देण्याची पद्धत नसल्यामुळे गोमंतकीय नसलेल्या रहिवाशांची अडचण होते. अशा लोकांना मूळ ठिकाणी जाऊन परत नोंदणी करणे शक्य नसते; कारण इतर सर्व कागदपत्रांवर गोव्याचा पत्ता असतो.

अधिवक्ते ‘जाहिरातबाजी (विज्ञापनबाजी)’ करू शकतात कि नाही ?

आजकालच्या जमान्यात प्रत्येक वस्तू किंवा सेवेचे विज्ञापन, ‘ब्रँडिंग’, ‘प्रमोशन’ (विज्ञापन) केल्याविना व्यवसायवृद्धी होऊच शकत नाही. जगाच्या या जीवघेण्या स्पर्धेमध्ये जर टिकायचे असेल…

‘अ‍ॅफिडेव्‍हिट’ काय असते ?

‘अ‍ॅफिडेव्‍हिट’ म्‍हणजे स्‍टँप पेपरवर स्‍वतःविषयी दिलेले लेखी स्‍पष्‍टीकरण ! ‘आता मी खरेच सांगत आहे’, असे तोंडी तर म्‍हणता येणार नाही; म्‍हणून कागदोपत्री लेखी स्‍वरूपात म्‍हणणे मांडले की, ‘ते’ स्‍वीकारणे बंधनकारक असते. ही पद्धत इंग्रजांनी चालू केली.