पिंपरी-चिंचवड (पुणे) येथे ३ ते ४ बसगाड्या जळून खाक !

पिंपरी-चिंचवड (जिल्‍हा पुणे) – ताथवडे येथे जे.एस्.पी.एम्. महाविद्यालयाच्‍या परिसरात लावलेल्‍या शाळेच्‍या ३ ते ४ बसगाड्यांना रात्री ११.१५ वाजता अचानक आग लागली. त्‍यानंतर एका पाठोपाठ एक असे ३ पेक्षा अधिक स्‍फोट झाले. शाळेच्‍या बसगाड्या गॅसवरील असल्‍याने मोठा स्‍फोट झाला. स्‍फोटांच्‍या आवाजामुळे नागरिक सैरावैरा धावत सुटले होते. आग विझवल्‍याने जीवितहानी झालेली नाही.