सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्‍या हातातून चैतन्‍य प्रक्षेपित होत असल्‍याची आलेली अनुभूती

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ

१. सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी अंधारात समोरच्‍या डोंगराच्‍या दिशेने हात फिरवल्‍यावर विजेरीसारखा प्रकाशझोत दिसणे 

‘२२.४.२०२२ या दिवशी रात्री ८.३० वाजता रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमाच्‍या तिसर्‍या माळ्‍याच्‍या आगाशीतून सद़्‍गुरु डॉ. मुकल गाडगीळ साधकांना प्रयोग करून दाखवत होते. त्‍यांनी अंधारात समोरच्‍या डोंगराच्‍या दिशेने हात फिरवला. तेव्‍हा ‘त्‍यांच्‍या हातातून परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍याप्रमाणेच चैतन्‍य प्रक्षेपित होत आहे’, असे मला दिसले. समोरच्‍या डोंगरावर काळोख होता; पण सद़्‍गुरु गाडगीळकाकांनी हात फिरवल्‍यावर त्‍या ठिकाणी विजेरीसारखा प्रकाशझोत दिसला. ‘सद़्‍गुरु काका ज्‍या दिशेने हात करत होते, त्‍या दिशेने प्रकाश सरकत आहे’, असे मला दिसत होते. सद़्‍गुरु काकांच्‍या हातातून वाफेसारखे चैतन्‍य बाहेर पडत होते.

श्री. शंकर नरुटे

२. ‘साधकाने योग्‍य साधना करणे आणि परात्‍पर गुरु (डॉ.) आठवले यांचा संकल्‍प’ यांमुळे साधकांमधील चैतन्‍यात वृद्धी होत असल्‍याची आलेली प्रचीती

त्‍यानंतर सद़्‍गुरु गाडगीळकाकांनी मला डोंगराकडे हात फिरवून पहायला सांगितले. त्‍या वेळी माझ्‍या हातातून काही प्रमाणात, म्‍हणजे परात्‍पर गुरु डॉक्‍टरांच्‍या तुलनेत ५ ते ७ टक्‍केच प्रकाश पडल्‍याचा दिसत होता. सद़्‍गुरु गाडगीळकाका यांचा प्रवास सद़्‍गुरुपदाच्‍या पुढे चालू असल्‍यामुळे परात्‍पर गुरु डॉक्‍टरांच्‍या प्रमाणे सद़्‍गुरु गाडगीळकाकांच्‍या हातातून ८ टक्‍के प्रकाश बाहेर पडत असल्‍याचे जाणवत होते. ‘त्‍यांच्‍या देहातूनही ८ टक्‍के प्रकाशझोत बाहेर पडत आहे’, असे मला जाणवते. परात्‍पर गुरु डॉक्‍टरांच्‍या संकल्‍पामुळे साधकांच्‍या साधनेनुसार त्‍यांच्‍या हातातून प्रकाश बाहेर पडतांना दिसतो. हे वरील प्रसंगातून परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी माझ्‍या लक्षात आणून दिले.

३. जाणवलेली सूत्रे 

अ. व्‍यक्‍तीने योग्‍य साधना केल्‍यावर तिच्‍या देहातील चैतन्‍य वाढते आणि चैतन्‍यामुळे स्‍थूल अन् सूक्ष्म स्‍तरावर कार्य होते.

आ. परात्‍पर गुरु डॉक्‍टरांचे हात, देह आणि डोळे यांतून १० टक्‍के प्रकाश बाहेर पडतो. त्‍यामुळे सभोवतालचे सर्व वातावरण प्रकाशमान होते.’

– श्री. शंकर नरुटे (वर्ष २०२२ मधील आध्‍यात्मिक पातळी ६५ टक्‍के, वय ३८ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२४.४.२०२२)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक