पंढरपूर (जिल्हा सोलापूर) येथे वृक्ष लागवड योजनेत १ कोटी २५ लाख रुपयांचा अपहार !

तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ करणारे पोलीस आणि अपहार करणारे कर्मचारी यांचे काही लागेबांधे आहेत, असे जनतेला वाटल्यास चूक ते काय ?

भोसरी भूखंड प्रकरणी एकनाथ खडसे यांना कारागृहात जावे लागेल ! – गिरीश महाजन, आमदार, भाजप

आपली भूमिका स्पष्ट करतांना आमदार एकनाथ खडसे म्हणाले, ‘‘भोसरी भूखंड प्रकरणी आतापर्यंत अनेक चौकशी समित्यांकडून चौकशी झाली. त्यात काही सापडले नाही. फडणवीस सरकारने मी निर्दोष (क्लीनचीट) असल्याचा अहवाल दिला आहे.

२ अल्पवयीन मुलींना पळवून नेल्याच्या प्रकरणी २ अल्पवयीन मुलांवर गुन्हा नोंद !

कुंभारी विडी घरकुलमधील २ अल्पवयीन मुलांनी २ अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली असून या प्रकरणी वळसंग पोलीस ठाण्यात २ अल्पवयीन मुलांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

भुसावळ (जिल्हा जळगाव) येथे तहसीलदारांच्या खोट्या आदेशाद्वारे भूखंड विक्री !

विशेष वसुली अधिकार्‍यासह नायब तहसीलदार आणि लिपिक यांना अटक !

नाशिक येथील ‘स्मार्ट सायकल प्रकल्पा’त २० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा संशय

शहराच्या सार्वजनिक वाहतुकीला चालना देण्ो आणि नागरिकांचे आरोग्य यांसाठी ‘स्मार्ट सिटी कॉर्पोरेशन’ आस्थापनाच्या अंतर्गत गाजावाजा करून ‘पीपीपी’ तत्त्वावर चालू केलेला ‘पब्लिक बायसिकल शेअरिंग’ प्रकल्प बंद पडला आहे.

पुणे येथील दगडूशेठ गणपति मंदिरात ११ दिवसांच्या ‘अतिरुद्र महायागा’ला प्रारंभ !

आयुर्वेदातील २१ औषधी वनस्पतींचा वापर होम-हवनाच्या वेळी करण्यात येत आहे. सर्व नद्यांच्या एकत्रित केलेल्या मंत्रोच्चारीत पाण्याचा श्रींना जलाभिषेक करण्यात येत आहे.

माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी घेतले श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन !

माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असलेल्या श्री महालक्ष्मी मंदिरात सहकुटुंब जाऊन श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन घेतले. मनोज नरवणे हे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने कोल्हापूर येथे आले आहेत.

श्रावणी सोमवारनिमित्त श्री सिद्धरामेश्वर मंदिरात सहस्रो भाविकांनी घेतले दर्शन !

श्रावण मासानिमित्त मंदिरातील श्री सिद्धरामेश्वरांच्या योगसमाधीला विविध रंगीबेरंगी फुलांच्या माळांनी सजवण्यात आले आहे, तसेच मंदिरात पहाटेपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

नागपूर येथे ५ सहस्र शालेय विद्यार्थी शाडूच्या मूर्ती घडवणार !

येथील ‘ग्रीन अर्थ ऑर्गनायझेशन’च्या वतीने शहरातील अनुमाने १० शाळांमध्ये ५ सहस्र विद्यार्थी पर्यावरणपूरक शाडूच्या गणेशमूर्ती घडवणार आहेत. ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या मूर्ती पर्यावरणाला हानीकारक असल्यामुळे विद्यार्थी या मूर्ती त्यांच्या घरी ३१ ऑगस्ट या दिवशी म्हणजे गणेशचतुर्थीच्या दिवशी ते त्यांची स्थापना करतील

संजय राऊत यांच्यानंतर अनिल परब कारागृहामध्ये जाणार ! – किरीट सोमय्या, भाजप नेते

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यानंतर लवकरच परिवहनमंत्री अनिल परब यांनाही अटक होऊ शकते, अशी माहिती भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली.