श्रावणी सोमवारनिमित्त श्री सिद्धरामेश्वर मंदिरात सहस्रो भाविकांनी घेतले दर्शन !

श्रावणी सोमवारनिमित्त श्री सिद्धरामेश्वर मंदिरात करण्यात आलेली फुलांची सजावट

सोलापूर, १ ऑगस्ट (वार्ता.) – श्रावण मासातील पहिल्या सोमवारच्या निमित्ताने येथील ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिरात सहस्रो भाविकांनी दर्शन घेतले. कोरोनाच्या  संसर्गामुळे मागील २ वर्षे दर्शनासाठी मंदिर बंद असल्याने भाविकांना दर्शन घेता आले नव्हते; मात्र सध्या मंदिरे खुली झाल्याने श्रावण मासातील पहिल्या सोमवारी मोठ्या संख्येने भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. श्रावण मासानिमित्त मंदिरातील श्री सिद्धरामेश्वरांच्या योगसमाधीला विविध रंगीबेरंगी फुलांच्या माळांनी सजवण्यात आले आहे, तसेच मंदिरात पहाटेपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.