पुणे – विश्व कल्याणासाठी आणि आरोग्यसंपन्न समाजासाठी ‘श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपति ट्रस्ट’च्या वतीने येथील दगडूशेठ गणपति मंदिरात ३० जुलै या दिवशी ११ दिवसांच्या अतिरुद्र महायागाला प्रारंभ झाला. वेदमूर्ती नटराजशास्त्री आणि १२५ ब्रह्मवृंद हा याग करत आहेत. या अंतर्गत महान्यास, मंत्रघोष, रुद्र जप, रुद्र होम, गणेश याग, सूर्य याग, विविध अभिषेक असे धार्मिक विधी केले जात आहेत.
आयुर्वेदातील २१ औषधी वनस्पतींचा वापर होम-हवनाच्या वेळी करण्यात येत आहे. सर्व नद्यांच्या एकत्रित केलेल्या मंत्रोच्चारीत पाण्याचा श्रींना जलाभिषेक करण्यात येत आहे. तरी भाविकांनी या विविध धार्मिक कार्यक्रमांत सहभागी व्हावे, असे आवाहन ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.