गोवा विधानसभा निवडणुकीतील ३०१ पैकी ८० उमेदवारांवर गुन्हे प्रविष्ट

२९ उमेदवारांवर आरोप निश्चित, तर दोघांना न्यायालयाने शिक्षा ठोठावली, सर्वाधिक गुन्हे नोंद असलेले उमेदवार काँग्रेसमध्ये

एस्.टी.च्या शेकडो प्रशिक्षणार्थ्यांकडून नियुक्तीसाठी परिवहनमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन !

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने २०१९ या वर्षी विविध पदांसाठी भरतीप्रक्रिया राबवून १ सहस्र ८०० जणांना प्रशिक्षण दिले होते; मात्र गेली २ वर्षे या प्रशिक्षणार्थ्यांची नियुक्ती करून घेतली नाही. त्यामुळे प्रशिक्षणार्थ्यांनी आंदोलन केले.

संभाजीनगर येथे एम्.आय.एम्. पक्षाने शहरात लावलेले फलक महापालिकेने रातोरात काढले !

शहरात ‘पंतप्रधान आवास योजने’चे काम ठप्प आहे, असा आरोप ‘एम्.आय.एम्.’चे खासदार इम्तियाज जलील यांनी करून एम्.आय.एम्. पक्षानेशहरातील प्रमुख ठिकाणी तसे फलक लावले होते.

विद्यापीठ चौक (पुणे) येथे काँग्रेसच्या ‘परिवर्तन रॅली’मुळे सलग ३ घंटे वाहतूक कोंडी !

काँग्रेसच्या ‘परिवर्तन रॅली’मुळे येथील विद्यापीठ चौक आणि परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली. हा चौक ओलांडण्यासाठी अर्धा घंट्याहून अधिक वेळ लागत असल्याने नागरिक त्रस्त झाले होते.

नाशिक येथे गॅस गिझर गळतीमुळे स्नानगृहात वैमानिक रश्मी गायधनी यांचा मृत्यू !

गॅस गिझरच्या गळतीमुळे ज्येष्ठ वैमानिक रश्मी गायधनी यांचा मृत्यू झाला आहे. त्या मुंबई येथील एअर इंडियामध्ये ज्येष्ठ वैमानिक होत्या. अंघोळीच्या वेळी गॅस गिझरमधून गळती झाल्यामुळे स्नानगृहात त्यांचा गुदमरून मृत्यू झाला.

शिवाजी पार्कवर लता मंगेशकर यांचे स्मारक उभारण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र

गानकोकिळा लता मंगेशकर यांचे शिवाजी पार्कमध्ये स्मारक उभारावे, अशी मागणी भाजपाचे आमदार राम कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केली आहे.

बार्शी (जिल्हा सोलापूर) येथे बंद महाविद्यालयाचे कुलूप तोडून चोरट्यांनी ११ संगणक पळवले !

सरस्वती विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय गावाबाहेर आहेत. २४ जानेवारी ते ५ फेब्रुवारी या कालावधीत संगणक कक्ष बंद होते. याचा अपलाभ घेत अज्ञात चोरट्यांनी कडीकोयंडा तोडून ही चोरी केल्याचे समोर आले आहे.

ओडिशा राज्यातील अपहृत मुलीची तळेगाव-दाभाडे (जिल्हा पुणे) येथून सुटका

ग्रामीण पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांना ती नवलाख उंबरे येथे एका खोलीत बंदीस्त असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार लोणावळा पोलिसांनी कार्यवाही केली. अपहरणाचे कारण समजू शकले नाही.

सनातनचे युवासाधक कु. हेरंब उदय धुरी यांच्या हस्ते पार पडले त्यांच्या शाळेत ध्वजारोहण !

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय नियमानुसार शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. सर्व विद्यार्थ्यांना हा कार्यक्रम ऑनलाईन दाखवण्यात आला.