मुंबई – गानकोकिळा लता मंगेशकर यांचे शिवाजी पार्कमध्ये स्मारक उभारावे, अशी मागणी भाजपाचे आमदार राम कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केली आहे. या संदर्भात बोलतांना शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले की, लतादीदींच्या स्मारकावरून राजकारण नको. त्या काही राजकारणी नव्हत्या. त्या स्वत: एवढ्या मोठ्या व्यक्ती होत्या, की देशालाही त्यांच्या स्मारकाविषयी विचार कारावा लागेल.