हिंदूंच्या हलाखीच्या स्थितीवर ʻहिंदु राष्ट्रʼच पर्याय !

‘छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि क्रांतीकारक यांच्यावर टीका करून गांधींच्या अहिंसेची प्रशंसा करणार्‍या हिंदूंची हलाखीची स्थिती झाली आहे. यात काय आश्चर्य ? यातून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग म्हणजे हिंदु राष्ट्राची स्थापना !’

हिंदूंनो, यासाठी तरी भग‍वंताची उपासना करा !

‘दंगली, युद्ध, नैसर्गिक आपत्ती इत्यादी संकटांतून सरकार, पोलीस आणि लष्कर वाचवू शकणार नाहीत. केवळ ईश्वरच वाचवू शकतो. यासाठी तरी साधना करा !’

स्वार्थी राजकारणी अन्‌ नि:स्वार्थी साधक !

‘साधक निवडणुकीत जिंकले, तरी त्यांना स्वार्थ नसल्याने ते राजकारण्यांप्रमाणे भ्रष्टाचार कधीच करणार नाहीत !’

कमरेवर हात ठेवून विठोबा का उभा आहे ?

‘यासंदर्भात विविध योगमार्गांप्रमाणे उत्तर देता येईल.
१. भक्तीयोग : विठोबा ‘केव्हा एकदा भक्त येईल आणि मी त्याला आलिंगन देईन’, याची वाट पहात उभा आहे.
२. कर्मयोग : विठोबा अकर्म-कर्म शिकवत आहे.
३. ज्ञानयोग : विठोबा साक्षीभावाने पहात आहे.’

दैनिक ‘सनातन प्रभात’च्या २५ व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा संदेश !

आज ‘सनातन प्रभात’चा ब्राह्म-क्षात्रतेजाचा दृष्टीकोन विकसित झालेला वाचकवर्गच सनातन धर्माची शक्ती बनला आहे. ‘सनातन प्रभात’ने निर्माण केलेली ही धर्मशक्ती धर्मसंस्थापनेच्या कार्याला बळ देईल आणि लवकरच हिंदु राष्ट्र स्थापन करील !’

केवळ संत-महात्म्यांमुळे हिंदु धर्म टिकला, हेच खरे !

. . . याउलट हिंदूंना धर्मशिक्षण नसल्यामुळे त्यांची त्यांच्या धर्मावर श्रद्धा नाही. एवढेच नव्हे, तर बुद्धीप्रामाण्यवाद्यांमुळे हिंदूंच्या मनात धर्माविषयी विकल्पही निर्माण होतात. यामुळे हिंदू त्यांच्या धर्माचा प्रसार करत नाहीत, एवढेच नव्हे, तर धर्मांतरही करतात. हिंदु धर्माचा जो थोडाफार प्रसार होतो, तो केवळ धर्मज्ञान असलेल्या संत महात्म्यांमुळे. संत-महात्म्यांमुळे आलेल्या अनुभूतींमुळेही काही हिंदूंची धर्मावर श्रद्धा आहे.’

रामराज्यासाठी आता हिंदूंनीच कृतीशील झाले पाहिजे !

‘हिंदूंनो, स्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या गेल्या ७५ वर्षांत १-२ राजकीय पक्ष वगळता अन्य कोणताही राजकीय पक्ष ‘हिंदु राष्ट्र हवे’, असे एकदाही बोलला नाही, तर ते कृती काय करणार ? हिंदूंनो, आता तुम्हीच जागे होऊन रामराज्यासाठी कृतीशील व्हा !’

अधिवक्त्यांच्या शिक्षणाचा काय उपयोग ?

‘गुन्हेगाराला वाचवण्याचे प्रयत्न करणारे अधिवक्ते असतात, म्हणजे त्यांना अधिवक्ता होण्याचे शिकवणार्‍या महाविद्यालयांत नैतिकतेचे मूलभूत सिद्धांत शिकवले जात नाहीत. अशा शिक्षणाचा काय उपयोग ?’

गुरूंपेक्षा गुरूंनी सांगितलेल्या उपास्यदेवतेची भक्ती अधिक करा !

‘गुरूंपेक्षा गुरूंनी ज्या देवतेचा नामजप करायला सांगितला असेल, त्या देवतेची भक्ती अधिक करायला हवी आणि त्या देवतेवरच अधिक श्रद्धा हवी; कारण ‘गुरु’ हे ईश्वराकडे घेऊन जाणारे मार्गदर्शक तत्त्व आहे

यातून होते हिंदु राष्ट्राची अपरिहार्यता स्पष्ट !

‘चांगली बातमी आहे’, असा एक दिवस तरी हिंदू आणि भारत यांच्यासाठी आहे का ?’