धर्म बुद्धीच्या पलीकडे आहे, हे ज्ञात नसलेले बुद्धीप्रामाण्यवादी !

‘बुद्धीप्रामाण्यवादी म्हणजे धर्मद्रोही; कारण धर्म बुद्धीच्या पलीकडचा आहे, तरी बुद्धीप्रामाण्यवादी त्याला बुद्धीच्या स्तरावर आणण्याचा प्रयत्न करतात !’ 

बुद्धीप्रामाण्यवादी कधी त्यांची मर्यादा जाणतील ?

‘बुद्धीप्रामाण्यवाद्यांना केवळ बुद्धीने कळलेल्या ज्ञानाचा अहंकार असणे, हे अल्प बुद्धी असलेल्या प्राण्यांनी ‘माणसापेक्षा आम्हाला अधिक कळते’, असे म्हणण्यासारखे आहे.’

बुद्धीप्रामाण्यवाद्यांनो, हे जाणा !

‘जगात चमत्कार असे काही नसते. सर्व ईश्वरेच्छा, वाईट शक्ती आणि प्रारब्ध यांनुसार घडते; पण हे बुद्धीप्रामाण्यवाद्यांना कळत नाही !’ 

सरकारचे गुन्हे झाल्यावर केले जाणारे हास्यास्पद उपाय !

‘आजार झाल्यावर उपाय करण्यापेक्षा आजार होऊ नये; म्हणून उपाय करायला हवेत, हेही सरकारला ज्ञात नसल्याने माणसाला सात्त्विक बनवणारी साधना शिकवण्याऐवजी सरकार भ्रष्टाचार, बलात्कार, गुन्हे इत्यादी करणार्‍यांना शिक्षा देण्यासारखे वरवरचे हास्यास्पद उपाय करते.’

हिंदु धर्माचा तिरस्कार करणाऱ्यांची अधोगती हाेण्यामागे असलेले कारण !

‘ब्राह्मणद्वेषामुळे ब्राह्मणेतर हिंदु धर्मापासून दूर गेले. त्यामुळे त्यांची सर्वच क्षेत्रांत परमावधीची अधोगती झाली.’

विवाहानंतरही माहेरचे आडनाव लावून हिंदु संस्कृतीतील दुसर्‍याशी एकरूप होण्याचे तत्त्व नाकारणारी स्त्रीमुक्ती नको ! 

‘स्वला त्यागून दुसर्‍यात विलीन होणे’, हा हिंदु धर्मातील मूलभूत सिद्धांत आहे. प्राचीन परंपरेनुसार विवाहानंतर मुलीने सासरचे आडनाव लावण्यामागे ‘तिने सासरच्या कुटुंबामध्ये विलीन व्हावे’, असा उद्देश होता.

अशांची नाेंद इतिहास का घेईल ?

‘शरीर, मन आणि बुद्धी यांनी समजेल असे विश्वात १ लक्षांश टक्केही नसतांना त्यांनी कळलेल्या गोष्टींचा बाऊ करणार्‍यांचे नाव इतिहासात कधी नोंदवले जाईल का ?’

भारताचे हे अद्वितीयत्व लक्षात घ्या !

‘जगभरच्या विदेशी लोकांना भारताविषयी प्रेम वाटते, ते भारतात संत शिकवत असलेली साधना आणि अध्यात्म यांमुळे, राजकारण्यांमुळे नाही कि शासनकर्त्यांमुळे नाही !’ 

भारतियांसाठी ही लज्जास्पद गाेष्ट !

‘एक सीताहरण झाल्यावर रामाने हरण करणार्‍या रावणाचा वध केला. याउलट हल्ली प्रत्येक वर्षी सहस्रो मुलींचे अपहरण होत असतांना त्यासंदर्भात संबंधित व्यक्तीच नाही, तर कोणतेच सरकारही काहीच करत नाही !’

स्वार्थी राजकारण्यांपेक्षा सर्वस्वाचा त्याग करणारेच श्रेष्ठ !

‘मला ‘हे हवे’, ‘ते हवे’, असे शासनकर्त्यांकडे मागणारे आणि ‘मला मत द्या’ असे जनतेकडे मागणारे राजकारणी देवाला आवडतील कि राष्ट्र आणि धर्म यांच्यासाठी सर्वस्वाचा त्याग करणारे देवाला आवडतील ?’