लक्षात घ्या, विज्ञानाची ही मर्यादा !
‘अध्यात्मशास्त्रामुळे विज्ञान कळते; पण विज्ञानामुळे अध्यात्म कळत नाही !’
‘अध्यात्मशास्त्रामुळे विज्ञान कळते; पण विज्ञानामुळे अध्यात्म कळत नाही !’
‘भारतात पोलीसदलासह सर्वच क्षेत्रांत गुन्हेगार असणे, हे स्वातंत्र्यापासूनच्या सर्वच शासनकर्त्यांना लज्जास्पद आहे ! मुलांना शाळेपासून साधना शिकवली असती, तर ती मोठी झाल्यावर कुणी गुन्हेगार झाला नसता.’
‘ज्यांनी सर्व धर्मांचा अभ्यास काय; पण वाचनही केले नाही, तेच ‘सर्वधर्मसमभाव’ म्हणतात !’
‘बुद्धीप्रामाण्यवादी यज्ञात आहुती देण्यात येणार्या वस्तूंच्या संदर्भात म्हणतात, ‘त्या वस्तू यज्ञात जाळता कशाला ?’ असे म्हणणे हे ‘इंजेक्शन देऊन एखाद्याला वेदना का देता ?’, असे म्हणण्यासारखे आहे. इंजेक्शनमुळे जसे लाभ होतात, तसेच यज्ञात आहुती दिल्यामुळे होतात, हे त्यांना कळत नाही.’
‘भक्तांकडेच मंदिरे हवीत, तरच देवाची सेवा भावपूर्ण होईल. सरकारीकरणामुळे मंदिरातील देवाची सेवा भावपूर्ण होत नाही, तसेच सरकारमध्ये असलेला भ्रष्टाचार देवळातही होतो. त्यामुळे देव मंदिरातून जाईल आणि भक्तांना देवळात जाण्याचा लाभ होणार नाही.’
‘प्रत्येक चुकीतून काहीतरी शिकता आले, तर चुकीमुळे दुःख न होता, शिकण्याचा आनंद मिळतो.’
‘क्रियमाणकर्माचा पूर्ण वापर करून प्रयत्नांची पराकाष्ठा करा; पण फलनिष्पत्ती प्रारब्धावर किंवा देवावर सोडा !’
कुठे परग्रहावर जाणारे यान शोधले की, विज्ञानाचे कौतुक करणारे बुद्धीप्रामाण्यवादी, तर कुठे सूक्ष्म देहाने विश्वातच नाही, तर सप्तलोक आणि सप्तपाताळ यांतही क्षणार्धात सूक्ष्मातून जाऊ शकणारे ऋषि-मुनी !
‘देवाची कृपा अनुभवल्यावर समाजातून कुणी कौतुक केले, तरी त्याची किंमत शून्य वाटते.’
‘निवडणुकीच्या काळात राजकारणी ‘हे देऊ, ते देऊ’, असे सांगतात आणि फारच थोडे भौतिक सुख देतात. याउलट संत आणि सनातन संस्था सर्वस्वाचा त्याग करायला शिकवून चिरंतन आनंद देणारी ईश्वरप्राप्ती करून देतात.’