केवळ संत-महात्म्यांमुळे हिंदु धर्म टिकला, हेच खरे !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘इतर धर्मियांना धर्मशिक्षण असल्यामुळे त्यांची त्यांच्या धर्मावर श्रद्धा आहे. त्यामुळे ते त्यांच्या धर्माचा प्रसार करतात. याउलट हिंदूंना धर्मशिक्षण नसल्यामुळे त्यांची त्यांच्या धर्मावर श्रद्धा नाही. एवढेच नव्हे, तर बुद्धीप्रामाण्यवाद्यांमुळे हिंदूंच्या मनात धर्माविषयी विकल्पही निर्माण होतात. यामुळे हिंदू त्यांच्या धर्माचा प्रसार करत नाहीत, एवढेच नव्हे, तर धर्मांतरही करतात. हिंदु धर्माचा जो थोडाफार प्रसार होतो, तो केवळ धर्मज्ञान असलेल्या संत महात्म्यांमुळे. संत-महात्म्यांमुळे आलेल्या अनुभूतींमुळेही काही हिंदूंची धर्मावर श्रद्धा आहे.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले