संशोधनाच्या संदर्भात कुठे बालवाडीतील असल्याप्रमाणे पाश्‍चात्त्य संशोधक, तर कुठे सर्वज्ञ ऋषि !

‘कुठे एखाद्या विषयाचे काही वर्षे संशोधन करून संख्याशास्त्रावरून (Statistics वरून) निष्कर्ष काढणारे पाश्‍चात्त्य संशोधक, तर कुठे कुठल्याही प्रकारचे संशोधन न करता मिळणार्‍या ईश्‍वरी ज्ञानामुळे कुठल्याही विषयांवरील निष्कर्ष तात्काळ सांगणारे ऋषि !’

नश्‍वर देह आणि आत्मा

‘या नश्‍वर देहास बाहेरून सजवण्यासाठी निरनिराळे अलंकार घातले, निरनिराळ्या प्रकारची उटणी, साबण यांनी स्वच्छ करून आणि सुवासिक करण्याचा प्रयत्न केला, तरी त्या देहातील आत्म्यास त्याचा काहीही उपयोग नसतो.

ज्योतिषशास्त्राचे महत्त्व !

‘कुठे पुढील काही वर्षांत काय होणार, याचा अंदाज बुद्धीचा वापर करून सांगणारे पाश्‍चात्त्य, तर कुठे युगायुगांच्या संदर्भात सांगणारे ज्योतिषशास्त्र !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले  

हास्यास्पद बुद्धीप्रामाण्यवादी !

‘प्राथमिक शाळेतील मुलाने पदव्युत्तर शिक्षण किंवा डॉक्टरेट झालेल्याशी वाद घालावा, तसे बुद्धीप्रामाण्यवादी अध्यात्मातील अधिकार्‍यांशी वाद घालतात !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

कालमानाप्रमाणे पदार्थाची किंमत आणि त्याचे महत्त्व

‘जगाला जाळून टाकण्याची इच्छा करणार्‍या क्रूर मनास ‘अ‍ॅटम्बॉम्बचे’ महत्त्व वाटत असले, तरी दयाशील असणार्‍या साधूस दान, धर्म आणि परोपकार याचीच अधिक किंमत वाटत असते….

अंतर्ज्ञानी भारतीय ऋषि !

‘पाश्‍चात्त्यांना संशोधनासाठी यंत्रे लागतात. ऋषींना आणि संतांना लागत नाहीत. त्यांना यंत्रांच्या अनेक पटींनी माहिती मिळते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले  

 विरक्ताने जीभ आवरावी !

‘जन्म झाल्यापासून कितीही खाल्ले असले, तरी ‘खायला हे पाहिजे, ते पाहिजे’ म्हणून कटकट करणारी जीभ कधी गप्प बसली आहे, असे नाही…

अब्जाधिशाचा उधळ्या मुलगा आणि हिंदू !

‘एका अब्जाधिशाच्या मुलाने त्याची सर्व संपत्ती उधळून टाकावी, तशी हिंदूंच्या मागच्या पिढ्यांनी सर्व धर्मसंपत्ती मातीमोल केली आहे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

बोलल्याप्रमाणे चालणारी माणसे हवीत !

नुसते बोलून भागणार नाही. पाकशास्त्राचे नुसते तोंडाने वर्णन केल्यास त्याने पोट भरेल का ? त्यासाठी स्वयंपाक करून जेवण केल्यानेच पोट भरणार आहे. म्हणूनच मनुष्याने बोलल्याप्रमाणे वागणेच योग्य होय.