हिंदु धर्माची अद्वितीय शिकवण !
‘देव सर्वत्र आहे, प्रत्येकात आहे’, ही हिंदु धर्माची शिकवण असल्यामुळे हिंदूंना इतर धर्मियांचा द्वेष करायला शिकवले जात नाही.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘देव सर्वत्र आहे, प्रत्येकात आहे’, ही हिंदु धर्माची शिकवण असल्यामुळे हिंदूंना इतर धर्मियांचा द्वेष करायला शिकवले जात नाही.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘नोकरी करायची असेल, तर कुणाची तरी करण्यापेक्षा देवाची करा. देव नोकरीसंबंधी थोडेसे काहीतरी देण्यापेक्षा सर्वकाही देईल !’
‘सत्ययुगात नियतकालिके, दूरचित्रवाहिन्या, संकेतस्थळे इत्यादींची आवश्यकताच नव्हती; कारण वाईट बातम्या नसायच्या आणि सर्वजण भगवंताच्या अनुसंधानात असल्याने आनंदी होते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘माणुसकी शिकवणारी साधना सोडून इतर सर्व विषय शिकवणार्या आधुनिक शिक्षणप्रणालीमुळे राष्ट्राची परमावधीची अधोगती झाली आहे.’
‘नोबेल पारितोषिक मिळवणार्यांची नावे काही वर्षांतच विसरली जातात; पण धर्मग्रंथ लिहिणारे वाल्मीकिऋषि, महर्षि व्यास, वसिष्ठऋषि इत्यादींची नावे युगानुयुगे चिरंतन रहातात.’
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे तेजस्वी विचार
विद्यार्थ्यांना व्यवहारज्ञानापुरते आवश्यक तेवढे शिक्षण देऊन त्यांचा उर्वरित वेळ वरील विषय शिकवण्यापेक्षा समाजप्रेम, राष्ट्रप्रेम, धर्मप्रेम, अध्यात्मशास्त्र, साधना यांसारखे विषय शिकवण्यासाठी का वापरत नाही ? हिंदु राष्ट्रात असे सर्व विषय शिकवले जातील.’
सनातन हिंदु धर्माला उत्पत्ती नसल्यामुळे, म्हणजे तो अनादि असल्यामुळे तो अनंत काळपर्यंत रहातो. हे हिंदु धर्माचे वैशिष्ट्य आहे.
‘हिंदु धर्मात सांगितले आहे तितके सखोल ज्ञान इतर एकातरी पंथात आहे का ? विज्ञानाला तरी ज्ञात आहे का ?’
‘निरक्षराने ‘सर्व भाषांतील अक्षरे सारखीच असतात’, असे म्हणणे, जसे म्हणणार्याचे अज्ञान दाखवते, त्याचप्रमाणे ‘सर्वधर्मसमभाव’ म्हणणारे त्यांचे अज्ञान दाखवतात. ‘सर्व औषधे, सर्व कायदे सारखेच आहेत’, असे म्हणण्यासारखे ‘सर्वधर्मसमभाव’ म्हणणे आहे.’