सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी सांगितलेली साधनेविषयीची मौलिक सूत्रे

‘सत्संग, बैठक, प्रसार, संपर्क अथवा एखादी सेवा केल्यानंतर ‘मला काय शिकायला मिळाले ?’, असा विचार माझ्या मनात लगेच येतो का ?’, असा विचार मनात येणे, म्हणजेच शिकण्याच्या स्थितीत रहाणे होय. हे साधनेला अत्यंत पोषक आहे.

सध्याची समाजस्थिती डोळे झाकून आंधळ्याच्या मागेच जाणे

आजचा समाज ‘अन्धेनैव नीयमाना यथान्धाः ।’ म्हणजे ‘एका अंधाने नेलेल्या दुसर्‍या अंध माणसाप्रमाणे डोळे झाकून आंधळ्याच्या मागेच चालला असून त्यातच ‘आपण धन्य झालो आहोत’, असे समजतो.’

सत्ययुगाचे महत्त्व !

‘सत्ययुगात नियतकालिके, दूरचित्रवाहिन्या, संकेतस्थळे इत्यादींची आवश्यकताच नव्हती; कारण वाईट बातम्या नसायच्या आणि सर्वजण भगवंताच्या अनुसंधानात असल्याने आनंदी होते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘माणुसकी शिकवणारी साधना सोडून इतर सर्व विषय शिकवणार्‍या आधुनिक शिक्षण प्रणालीमुळे राष्ट्राची परमावधीची अधोगती झाली आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

मनमोकळेपणा आणि आध्यात्मिक मित्र

मनमोकळेपणाने मनातील विचार त्वरित उत्तरदायी साधक किंवा संबंधितांना सांगावेत. मनातील विचारांचा निचरा होऊन मन शांत होण्यासाठी ‘आध्यात्मिक मित्र किंवा मैत्रीण’ असल्यास त्यांच्याशी बोलावे.

स्वतःतील दोष दूर करण्याचे महत्त्व

आपले दोष निदर्शनास आणण्याचा प्रयत्न केल्यासच ते नाहीसे होण्याची शक्यता असते; अन्यथा उलटपक्षी ते तसेच राहून जातात. हे चोरांना घरात कोंडून ठेवण्यासारखेच आहे.’

कुठे नोबेल पारितोषिक मिळवणारे, तर कुठे ऋषिमुनी !

‘नोबेल पारितोषिक मिळवणार्‍यांची नावे काही वर्षांतच विसरली जातात; पण धर्मग्रंथ लिहिणारे वाल्मीकिऋषि, महर्षि व्यास, वसिष्ठऋषि इत्यादींची नावे युगानुयुगे चिरंतन रहातात.’

आत्मनिवेदन

आत्मनिवेदनाच्या माध्यमातून मनातील सर्व विचार भगवंताला सांगण्याची सवय लावावी. आत्मनिवेदनामुळे मन हलके होण्याच्या समवेत ईश्‍वराशी अनुसंधानही साधले जाते.

विवेक

देहाचे पांघरूण वस्त्र आणि माझे पांघरूण देह. त्यामुळे ‘माझ्या भानासह ‘मी’ देहाहून अगदीच भिन्न असणारा आहे’, असे वाटणे म्हणजेच विवेक.’ – प.प. भगवान श्रीधरस्वामी

राष्ट्र-धर्मासाठी आध्यात्मिक स्तरावरही कार्य करणे अत्यावश्यक !

‘शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक स्तरांवर राष्ट्र-धर्मासाठी कार्य करून काही साध्य होत नाही, हे गेल्या ७४ वर्षांत अनेकदा सिद्ध झाले आहे. ‘आता त्यांच्या जोडीला आध्यात्मिक स्तरावरही कार्य करणे अत्यावश्यक आहे’, हे सर्वांनी लक्षात घेणे आवश्यक आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले