महर्षींची साधकांसाठी संदेशसुमने !

प.पू. गुरुदेवांच्या कार्याशी एकरूप होणे, हाच भगवंताकडे जाण्याचा एकमेव मार्ग प.पू. गुरुदेवांना आपण ज्या रूपात पाहू, त्या रूपात ते आपल्याला दर्शन देतील. साधकांसाठी आणखी कोणी देवता नाही. साधकांसाठी एकच देवता आणि ती म्हणजे प.पू. गुरुदेव. प.पू. गुरुदेवांचे कार्य, विचार, सत्संग यांच्याशी एकरूप होणे, हाच भगवंताकडे जाण्याचा एकमेव मार्ग आहे.

साधकांच्या सर्व प्रकारच्या आवश्यकता पूर्ण करणारे प.पू. गुरुदेव ! प.पू. गुरुदेव आहेत, तर आपल्याला कोणत्याच रोगाचे भय नाही. दुर्धर रोगांतही गुरुदेव समवेत आहेत. साधकांच्या भौतिक आणि आध्यात्मिक आवश्यकता पूर्ण करणारे एकमेव प.पू. गुरुदेवच आहेत. साधकांना हे ज्ञात आहे का ?

राम आणि कृष्ण यांनीही कधी म्हटले नाही, की मी विष्णूचा अवतार आहे. तेव्हाही या अवतारत्वाविषयी सप्तर्षींनी लोकांना सांगितलेे किंवा अशरीर वाणीच्या माध्यमातून हे गुपित उघड झाले होते. देहात सूक्ष्म आत्मा असतो. त्याच्या आत अतीसूक्ष्म घटक असतो, त्याला आपण भगवंत म्हणतो. तो अतीसूक्ष्म भगवंत म्हणजे आपले प.पू. गुरुदेव आहेत !

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.