पाटलीपुत्र (बिहार) येथे औषध निरीक्षकाच्या घरातून ४ कोटी रुपयांची बेहिशोबी रोकड जप्त

एका औषध निरीक्षकाकडे इतकी रोकड सापडते, तर राजकारण्यांकडे किती रोकड सापडेल ?

दक्षता विभागाने माझ्या घरावर धाड टाकतांना माझ्या मुलाची हत्या केली !

पंजाबचे वरिष्ठ भारतीय प्रशासकीय अधिकारी (आय.ए.एस्.) संजय पोपली यांनी त्यांचा मुलगा कार्तिक यांची दक्षता विभागाने हत्या केल्याचा आरोप केला. दक्षता विभागवाले माझीही हत्या करतील, असा दावाही त्यांनी केला.

हिंदूंच्या मंदिरांचा पैसा हिंदूंच्या हितासाठीच वापरावा ! – विश्‍व हिंदु परिषद

‘संबंधित राज्य सरकारांच्या तावडीतून मंदिरे मुक्त करण्यासाठी आणि त्यांचे व्यवस्थापन हिंदु समाजाकडे सोपवण्यासाठी विहिंप अधिक तीव्र आंदोलन करील’, असा निर्धारही विश्‍व हिंदु परिषदेचे कार्याध्यक्ष आलोक कुमार यांनी या वेळी व्यक्त केला.

शाळेत यायला १० मिनिटे विलंब झालेल्या शिक्षिकेला मुख्याध्यापकाकडून चपलेने मारहाण

असे मुख्याध्यापक विद्यार्थ्यांपुढे काय आदर्श ठेवणार ?

पक्षी धडकल्याने योगी आदित्यनाथ यांचे हेलिकॉप्टर तातडीने उतरवले

या अपघातात कुणालाही दुखापत झाली नसून योगी आदित्यनाथ सुरक्षित असल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली. या घटनेची चौकशी करण्यात येत आहे.

कतारहून आलेल्या नेपाळी मुसलमानाकडून अल्पवयीन मुलीचे  अपहरण !

पोलिसांनी दरभंगा (बिहार) येथून घेतले कह्यात !
वासनांध मुसलमान !

गौतम अदानी यांच्या कुटुंबाकडून समाजकार्यासाठी ६० सहस्र कोटी रुपयांची देणगी !

अदानी म्हणाले की, हे दान भारतीय आस्थापनांच्या दान देण्याच्या इतिहासातील सर्वांत मोठे दान आहे. ‘विप्रो’ आस्थापनाचे प्रमुख आणि प्रसिद्ध दानशूर अझीम प्रेमजी यांनी अडाणी यांच्या देणगीला ‘महान’ असे संबोधले आहे.

एन्.आय.ए.कडून मिझोराममध्ये छापे

येथे काही मासांपूर्वी भारत आणि म्यानमार यांच्या आर्थिक चलनासह मोठ्या प्रमाणात स्फोटके सापडल्याच्या प्रकरणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (‘एन्.आय.ए’ने) ऐझवाल, चंपाई आणि कोलासिब या जिल्ह्यांमध्ये छापे टाकले.

गौहत्ती येथे बंडखोर आमदारांवर दिवसाला लाखो रुपयांचा व्यय !

‘रॅडिसन ब्लू’ उपाहारगृहात रहाणार्‍या आमदारांचा खाण्यावर प्रतिदिन ८ लाख रुपयांचा व्यय होतो, तर दुसरीकडे आसाममधील लोकांना पूर साहाय्य निधीच्या नावाखाली केवळ २ वाट्या तांदूळ आणि १ वाटी डाळ वाटली जात आहे.

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा ! – खासदार नवनीत राणा

सत्ता दूर जातांना पाहून सत्ताधारी पक्षाच्या गुंडांनी राज्यात धुमाकूळ घातला आहे. सत्तेचा दुरुपयोग वाढला आहे. राज्यातील जनतेच्या सुरक्षेसाठी आणि एकनाथ शिंदे यांच्यासमवेत गेलेल्या खर्‍या शिवसैनिकांच्या कुटुंबियांच्या सुरक्षिततेसाठी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा.