शाळेत यायला १० मिनिटे विलंब झालेल्या शिक्षिकेला मुख्याध्यापकाकडून चपलेने मारहाण

शिक्षिकेला मुख्याध्यापकाकडून चपलेने मारहाण

लखीमपूर खिरी (उत्तरप्रदेश) – शाळेत यायला १० मिनिटे विलंब झालेल्या एका शिक्षिकेला शाळेच्या मुख्याध्यापकाने चपलेने मारहाण केली. येथील माहुंगा खेडी गावातील शाळेत ही घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे.

मारहाणीच्या वेळी शाळेतील इतर शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थीही उपस्थित होते. घटनेनंतर मुख्याध्यापकाला निलंबित करण्यात आले असल्याची माहिती मूलभूत शिक्षण अधिकारी लक्ष्मीकांत पांडे यांनी दिली.

संपादकीय भूमिका

असे मुख्याध्यापक विद्यार्थ्यांपुढे काय आदर्श ठेवणार ?