कॅनडामध्ये भारतीय दूतावासांबाहेर खलिस्तान्यांची निदर्शने

कॅनडामध्ये २५ सप्टेंबर या दिवशी २ ठिकाणी भारताच्या विरोधात खलिस्तान्यांनी निदर्शने केली. या वेळी भारताचे राष्ट्रध्वज, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुतळा जाळण्यात आला.

निराधार आरोप करण्याची कॅनडाच्या पंतप्रधानांना सवय ! – अली सॅब्री, परराष्ट्रमंत्री, श्रीलंका

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी खलिस्तानी आतंकवादी हरदीप सिंह निज्जर याच्या हत्येच्या प्रकरणी भारताचा हात असल्याच्या केलेल्या आरोपावर आता श्रीलंकेने भारताच्या बाजू घेतली आहे.

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी संसदेत नाझी सैन्याधिकार्‍याचा टाळ्या वाजवून केला सन्मान !

‘नाझी, खलिस्तानी, गुंड आदींचे समर्थन करणारे आणि त्यांचा सन्मान करणारे जगातील एकमेव पंतप्रधान म्हणजे जस्टिन ट्रुडो’, अशीच यापुढे त्यांची ओळख निर्माण होईल !

नेपाळमधून सोन्याची तस्करी करणार्‍या चिनी लोकांकडे सापडले भारतीय आधारकार्ड !

बनावट आधारकार्ड, मतदान ओळखपत्रे आणि अन्य सरकारी कागदपत्रे बनवून देणार्‍यांनाही आता फाशीची शिक्षा होणारा कायदा बनवण्याची आवश्यकता आहे !

न्यू जर्सी (अमेरिका) येथे भारताबाहेरील सर्वांत मोठ्या हिंदु मंदिराचे ८ ऑक्टोबरला होणार उद्घाटन !

भारताच्या बाहेर जगातील सर्वांत मोठे हिंदु मंदिर येथे बांधण्यात आले आहे. स्वामीनारायण संप्रदायाचे हे मंदिर न्यू जर्सीच्या रॉबिंसविले शहरामध्ये आहे.

चीनकडून पाकला निकृष्ट दर्जाच्या कोळशाची निर्यात !

कावेबाज आणि स्वार्थलोलूप चीनपासून जग सावध झालेच आहे ! आता पाकलाही हे समजेल, अशी आशा !

…तर ट्रुडो यांना देशांतर्गत आणि जागतिक स्तरावर मोठ्या मानहानीला सामोरे जावे लागेल !

अल्प होत असलेल्या लोकप्रियतेच्या पार्श्‍वभूमीवर ट्रूडो यांनी निज्जर हत्येचे सूत्र उपस्थित केले आहे. याच खलिस्तानवाद्यांनी ट्रुडो यांची राजकीय कारकीर्द संपुष्टात आणल्यास आश्‍चर्य वाटू नये !

पाकिस्तानातील ३९ टक्के लोकसंख्या दारिद्य्ररेषेखाली !

जागतिक बँकेने म्हटले आहे की, वर्ष २०२२ मध्ये पाकिस्तानात गरिबी ३४.२ टक्के होती, ती आता ५ टक्क्यांनी वाढून ३९.४ टक्के इतकी झाली आहे.

कोरोना महामारीत केलेल्या साहाय्यामुळे संयुक्त राष्ट्रांच्या व्यासपिठावरून अनेक देशांनी मानले भारताचे आभार !

हे वृत्त म्हणजे भारतावर आगपाखड करणार्‍या देशांच्या आणि जागतिक नेत्यांच्या डोळ्यांत झणझणीत अंजनच होय !

ट्रुडो यांनी निज्जर याच्या हत्येचे सांगितलेले पुरावे आधीपासून इंटरनेवर उपलब्ध आहेत !  – डेव्हिड एबी, ब्रिटीश कोलंबिया राज्याचे राज्यपाल

ट्रुडो यांनी भारतावर आरोप केल्यापासून त्यांच्याच देशातील प्रसारमाध्यमे, विरोधी पक्षनेते, राजकीय नेते, तसेच जनताही त्यांच्यावर टीका करू लागली आहे. यातून ट्रुडो जगासमोर उघडे पडलेच आहेत !