ट्रुडो यांनी निज्जर याच्या हत्येचे सांगितलेले पुरावे आधीपासून इंटरनेवर उपलब्ध आहेत !  – डेव्हिड एबी, ब्रिटीश कोलंबिया राज्याचे राज्यपाल

कॅनडाच्या ब्रिटीश कोलंबिया राज्याच्या राज्यपालांनी पंतप्रधान ट्रुडो यांना उघडे पाडले !

डावीकडून डेव्हिड एबी आणि जस्टिन ट्रुडो

ओटावा (कॅनडा) – खलिस्तानी आतंकवादी हरदीपसिंह निज्जर याची कॅनडातील ब्रिटीश कोलंबिया राज्यातील सरे शहरात हत्या झाल्यानंतर पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी या हत्येत भारताचा हात असल्याचा आरोप करत त्याविषयी पुरावे असल्याचाही दावा केला आहे; मात्र त्यांनी कोणतेही पुरावे सादर केलेले नाहीत. याविषयी आता ब्रिटीश कोलंबिया राज्याचे राज्यपाल डेव्हिड एबी यांनी ट्रुडो यांना उघडे पाडले आहे. ते म्हणाले की, निज्जर याच्या हत्येविषयी आपल्याला जे काही ठाऊक आहे, ते सार्वजनिक ठिकाणी उपलब्ध आहे. हे खूप निराशाजनक आहे. ट्रुडो यांनी कॅनडाच्या गुप्तचर यंत्रणेकडून माहिती घेतली होती; मात्र ती इंटरनेटवर उपलब्ध आहे. या माहितीखेरीज मला अन्य काहीही मिळाले नाही.

संपादकीय भूमिका 

ट्रुडो यांनी भारतावर आरोप केल्यापासून त्यांच्याच देशातील प्रसारमाध्यमे, विरोधी पक्षनेते, राजकीय नेते, तसेच जनताही त्यांच्यावर टीका करू लागली आहे. यातून ट्रुडो जगासमोर उघडे पडलेच आहेत !