इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानातील ९ कोटी ५० लाख लोक दारिद्य्ररेषेखाली जीवन जगत आहेत. एकूण २४ कोटी लोकसंख्या असलेल्या पाकिस्तानात हे प्रमाण ३९.४ टक्के आहे. त्यांची प्रतिदिनची कमाई १ सहस्र ४८ पाकिस्तानी रुपये आहे, म्हणजे भारतीय चलनाप्रमाणे ही रक्कम ३०० रुपये इतकी आहे. जागतिक बँकेने म्हटले आहे की, वर्ष २०२२ मध्ये पाकिस्तानात गरिबी ३४.२ टक्के होती, ती आता ५ टक्क्यांनी वाढून ३९.४ टक्के इतकी झाली आहे.
पाकिस्तान में 9.5 करोड़ लोग गरीबी रेखा से नीचे रह रहे हैं। कुल आबादी 24 करोड़ का यह 39.4% है। इनकी दिनभर की कमाई 1,048 पाकिस्तानी रुपए है। भारतीय करेंसी में यह 300 रुपए के बराबर है। #Pakistan #EconomicCrisishttps://t.co/6547OYk4qq pic.twitter.com/EfZJ63hzPC
— Dainik Bhaskar (@DainikBhaskar) September 24, 2023
एका वर्षात पाकिस्तानमध्ये १ कोटी २५ लाख लोक दारिद्य्ररेषेखाली आल्याचे जागतिक बँकेने म्हटले आहे. यामुळे दारिद्य्ररेषेखालील लोकसंख्या ९ कोटी ५० लाख झाली आहे. जागतिक बँकेने पाकिस्तानला कृषी आणि भूमी खरेदी-विक्री (रिअल इस्टेट) यांवर कर लादण्यास आणि अनावश्यक व्यय अल्प करण्यास सांगितले आहे. जागतिक बँकेने शुक्रवारी पाकिस्तानच्या पुढील सरकारसाठी धोरणाचा मसुदा सिद्ध केला आहे. यामध्ये पाकिस्तानच्या आर्थिक परिस्थितीशी संबंधित माहिती देण्यात आली आहे.