(म्‍हणे) महाराष्‍ट्रात निवडणुकीचा दिखावा, निकाल देहलीत आधीच निश्‍चित ! – नताशा आव्‍हाड

उजवीकडे नताशा आव्‍हाड

मुंबई – महाराष्‍ट्रात झालेल्‍या विधानसभेच्‍या निवडणुका हा केवळ दिखावा होता. निवडणुकीपूर्वीच निकाल देहली येथे निश्‍चित करण्‍यात आला होता, अशी मुक्‍ताफळे जितेंद्र आव्‍हाड यांची मुलगी नताशा आव्‍हाड यांनी ‘एक्‍स’ खात्‍यावरून उधळली आहेत.

नताशा यांनी म्‍हटले आहे की, निकालात फेरफार करून भाजप स्‍वतःला १०० च्‍या जवळपास जागा घेऊन शांत बसली असती; पण स्‍वत:च्‍या मित्रपक्षांना महाविकास आघाडीसमवेत आघाडी करण्‍याची त्‍यांना संधी द्यायची नव्‍हती. मित्रपक्षांना भाजपविना सत्ता स्‍थापन करता येणार नाही, अशा पद्धतीन मित्रपक्षांच्‍या जागा जिंकून आणण्‍यात आल्‍या. अदानीने धारावी प्रकल्‍प गमावला असता, तर केंद्रातील  सरकार धोक्‍यात आले असते आणि महाराष्‍ट्राच्‍या राजकारणात दुर्लक्षित झाले असते, यासाठी भाजपने ‘ईव्‍हीएम्’ द्वारे अधिक जागा निवडून आणल्‍या.