मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, खासदार सुनील तटकरे आणि खासदार सौ. सुनेत्रा पवार यांनी १२ डिसेंबर या दिवशी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची देहली येथे भेट घेतली. याविषयीची माहिती अजित पवार यांनी त्यांच्या ‘एक्स’ खात्यावरून प्रसारित केली आहे. या वेळी अमित शहा यांच्याशी काही महत्त्वपूर्ण सूत्रांविषयी चर्चा झाल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रात मंत्रीमंडळाचा विस्तार होण्यापूर्वी अजित पवार यांनी अमित शहा यांची घेतलेली भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे. त्यांच्यासमवेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते उपस्थित असल्यामुळे या वेळी धोरणात्मक चर्चा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
देशाचे केंद्रीय गृहमंत्री मा. श्री. अमितजी शहा यांच्याशी आज दिल्लीत सौहार्दपूर्ण भेट घेतली. या भेटीदरम्यान विविध महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.@AmitShah @praful_patel @SunilTatkare @SunetraA_Pawar pic.twitter.com/nWnd6f815t
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) December 12, 2024