साधकांनो, ‘साधनेला विरोध होऊ नये’, यासाठी घरी आणि सार्वजनिक ठिकाणी ‘भ्रमणभाषवर मोठ्याने नामजप, मंत्रजप, तसेच सात्त्विक उदबत्ती लावणे’ इत्यादी तारतम्याने करा !

सौ. रंजना गडेकर

‘साधक घरी (कुटुंबातील सदस्य असतांना), आस्थापनात किंवा कार्यालयात उपायांसाठी भ्रमणभाषवर नामजप, मंत्रजप किंवा स्तोत्रे मोठ्या आवाजात लावतात, तसेच सात्त्विक उदबत्तीही लावतात. नामजप आणि मंत्रजप यांच्या मोठ्या आवाजामुळे आजूबाजूच्या लोकांना त्रास होऊ शकतो. इतरांना त्याचे महत्त्व वाटत नसल्यामुळे ते विरोध करतात. त्यामुळे आपले त्यांच्याशी असलेले संबंध बिघडतात आणि अपसमज वाढतात. त्यांच्याकडून साधकांना ते करत असलेल्या साधनेला विरोध होऊ शकतो. त्यामुळे साधकांनी भ्रमणभाषवर मोठ्याने नामजप लावण्याऐवजी मनातल्या मनात नामजप करावा; परंतु जेथे विरोध नाही, तेथे उपायांसाठी नामजप आणि उदबत्ती लावावी.’

– सौ. रंजना गौतम गडेकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (११.१२.२०२०)