साधकांसाठी सूचना आणि वाचक, हितचिंतक अन् धर्मप्रेमी यांना नम्र विनंती !
भावी आपत्काळात सनातन आश्रमातील दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी देशी गायी आणि बैल यांची आवश्यकता भासणार आहे. त्यादृष्टीने काही हितचिंतकांनी देशी गाय आणि बैल अर्पण देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तसेच काही शेतकरी साधक आणि हितचिंतक यांनी अर्पण मिळालेल्या गायी आणि बैल यांचे काही काळासाठी संगोपन करण्याची सिद्धता दर्शवली आहे. अशा प्रकारे गायी आणि बैल अर्पण देण्यासाठी किंवा त्यांचे काही काळ संगोपन सेवा करण्याची सिद्धता असणार्यांनी संपर्क साधावा.
गाय पूर्णत: देशी आणि दुधारू असावी. तसेच बैलालाही शेतीच्या कामाची आणि बैलगाडी ओढण्याची सवय असावी. गाय आणि बैल अर्पण देऊ इच्छिणार्यांनी खालील क्रमांकावर दूरभाष करून गाय आणि बैल यांची जात, वय आदी माहिती विस्ताराने कळवावी.
गाय आणि बैल यांचे काही काळ संगोपन करण्याची सिद्धता असणार्यांनी या सेवेतील स्वत:चा अनुभव, किती काळ संगोपन करण्याची सिद्धता आहे आदी माहिती खालील दूरभाष क्रमांकावर कळवावी.
नाव आणि संपर्क क्रमांक
सौ. भाग्यश्री सावंत – ७०५८८८५६१० (सकाळी १० ते सायंकाळी ७ या वेळेत संपर्क करावा.)
टपालाचा पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, द्वारा ‘सनातन आश्रम’, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा. पिन – ४०३४०१’
संगणकीय पत्ता : [email protected]
– श्री. वीरेंद्र मराठे, व्यवस्थापकीय विश्वस्त, सनातन संस्था. (१०.१.२०२१)