साधकांसाठी महत्त्वाची सूचना
‘प्रतिवर्षी मार्चमध्ये, तसेच जुलै ते सप्टेंबर या काळात शासकीय वाचनालयांना ग्रंथखरेदीसाठी सरकारकडून अनुदान प्राप्त होते. त्यानंतर त्या वाचनालयाचे संचालक विविध ग्रंथ खरेदी करतात. वाचकांना राष्ट्र, धर्म आणि अध्यात्म या संदर्भातील अमूल्य ज्ञान सहजसोप्या भाषेत देणारे सनातनचे ग्रंथ अन् लघुग्रंथ सर्वत्रच्या वाचनालयांमध्ये ठेवता येतील. यासाठी सर्वत्रच्या साधकांनी पुढील प्रयत्न करावेत.
१. वाचनालयाचे संचालक, तसेच मुख्याध्यापक आणि प्राचार्य यांना संपर्क करणे
साधकांनी तालुका स्तरावरील वाचनालय प्रमुखांना संपर्क केल्यास त्या तालुक्यातील सर्व प्रमुखांची नावे आणि संपर्क क्रमांक मिळू शकतील. शाळांचे मुख्याध्यापक आणि महाविद्यालयांचे प्राचार्य, तसेच वाचनालयांचे ग्रंथपाल (लायब्रेरियन) यांना त्यांच्याकडील ग्रंथालयांकरता सनातनचे ग्रंथ घेण्यासाठीही प्रवृत्त करता येईल. यामुळे विद्यार्थ्यांना संस्कारक्षम वयात ‘बालसंस्कार’ लेखमालिकेतील, तसेच अन्य ग्रंथांचे वाचन करता येऊन त्यांचा लाभ घेता येईल.
अ. वाचनालय प्रमुख, तसेच मुख्याध्यापक आणि प्राचार्य यांना सनातनने प्रकाशित केलेल्या ग्रंथांची सूची दाखवावी. ती सूची पाहून त्यांना ‘सनातनच्या विविध विषयांवरील ग्रंथांची माहिती आणि ते कोणकोणत्या भाषेत उपलब्ध आहेत ?’ हे एकाच वेळी समजू शकते. वाचनालये, शाळा आणि महाविद्यालये यांसाठी सनातनचे ग्रंथ घेण्यास त्यांना प्रवृत्त करावे.
आ. राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांचा वसा घेतलेल्या ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांचे महत्त्व सांगून अंक चालू करण्याची विनंती करावी. वाचनालये, शाळा आणि महाविद्यालये येथे अंक चालू केल्यास एकाच वेळी अनेकांना अंक वाचता येऊन ते राष्ट्र आणि धर्म यांवर होणार्या आघातांविषयी अवगत होतील.
इ. वाचनालये, शाळा आणि महाविद्यालये येथे राष्ट्र, धर्म अथवा अध्यात्म यांविषयी उद्बोधक माहिती देणारी ‘ऑनलाईन’ प्रवचने आयोजित करण्याविषयी विचारणा करावी.
२. वाचनालयांना निधी देणार्या लोकप्रतिनिधींना सनातनच्या ग्रंथांचे महत्त्व सांगणे
बरेच आमदार आणि खासदार ‘मतदारसंघ विकास निधी’तून ग्रंथालये, वाचनालये आदींना ग्रंथ खरेदी करण्यासाठी निधी देतात अथवा काही ग्रंथ विकत घेऊन देतात. साधकांनी अशा लोकप्रतिनिधींना संपर्क करावा आणि त्या निधीतून सनातनचे ग्रंथ घेण्यास सांगावे. आतापर्यंत अशा प्रकारे बर्याच लोकप्रतिनिधींनी वाचनालयांसाठी सनातनचे ग्रंथ खरेदी करण्याकरता निधी उपलब्ध करून दिला आहे.
३. साधकांनो, वाचनालयाचे संचालक, प्रमुख, तसेच मुख्याध्यापक आणि प्राचार्य यांना संपर्क करा !
वरील संपर्काच्या वेळी वाचनालयाचे संचालक, प्रमुख, तसेच मुख्याध्यापक अन् प्राचार्य यांना सनातनचे ग्रंथ घेण्यासाठी प्रवृत्त करण्यासह त्यांच्या रूचीनुसार राष्ट्र, धर्म अथवा अध्यात्म यांच्या कार्यात सहभागी करून घेणे, तसेच त्यांच्याशी जवळीकता साधणे, या दृष्टीनेही प्रयत्न करावेत. जिल्हासेवकांनी वरील संपर्क करण्यासाठी काही साधकांचे नियोजन करावे आणि ‘ही सेवा प्राधान्याने पूर्ण होईल’, असे पहावे.
साधकांनो, वाचकाला सर्वांगस्पर्शी ज्ञानभांडार देणारे सनातनचे ग्रंथ आणि लघुग्रंथ अधिकाधिक वाचनालयांपर्यंत पोचवून गुरुकार्याचा प्रसार करा !’