पाकिस्तानमध्ये धर्मांधांकडून हिंदूंच्या अपहरणाच्या विरोधात अल्पसंख्यांकांचा मोर्चा !

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार आंदोलकांनी काश्मीर जिल्ह्यातील गुन्हेगारीग्रस्त कंधकोटमध्ये कायदा आणि सुव्यवस्था पुनर्स्थापित करण्यासाठी आवाज उठवला.

जो धर्म समानतेचा अधिकार देत नाही, तो रोगाप्रमाणे ! – काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे पुत्र प्रियांक खर्गे

ते तमिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांच्या सनातन धर्माविषयी केलेल्या विधानावरून प्रतिक्रिया व्यक्त करतांना बोलत होते.

रत्नागिरी : ‘सायकल फेरी’ काढून जिल्हा प्रशासनाने केली जनजागृती !

कागदी लगद्याच्या मूर्ती पर्यावरणास घातक असल्याचे यापूर्वी संशोधनातून सिद्ध झाले आहे, तर राष्ट्रीय हरित लवादानेही कागदी लगद्याच्या मूर्ती पर्यावरणास अनुकूल नसल्याचा निर्वाळा दिला आहे ! असे असतांना कागदी लगद्याच्या मूर्ती वापरण्याचे आवाहन प्रशासन कसे करते ?

चांदवड (जिल्हा नाशिक) येथे जनआक्रोश मोर्चात सहस्रो हिंदूंचा सहभाग !

‘लव्ह जिहाद’ आणि ‘धर्मांतरबंदी कायदा’ लागू करावा, या मागणीसाठी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या पुढाकाराने ‘जनआक्रोश मोर्चा’ काढण्यात आला.

ब्राह्मण संघाच्या वतीने संत पू. (श्रीमती) वैशाली मुंगळे यांचा ईश्वरपूर (जिल्हा सांगली) येथे सन्मान !

‘ब्राह्मण सभा इस्लामपूर आणि वाळवा तालुका ब्राह्मण संघ’ यांच्या संयुक्त विद्यमाने नुकत्याच झालेल्या एका समारंभात तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरवचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

सोलापूर येथे प्रतिदिन ५ लाख लिटर दूध संकलन असलेल्या केंद्रांची प्रशासनाकडे नोंदणी नाही !

जिल्ह्यात प्रतिदिन १२ लाख ७९२ लिटर दूध संकलन होते. त्यातील ५ लाख ५०० लिटर दुधाचे संकलन होत असलेल्या प्रकल्पाची जिल्हा प्रशासनाकडे नोंदच नाही. त्यामुळे भेसळ रोखण्यासाठी शासकीय यंत्रणा कुचकामी ठरत आहेत. यावर उपाय म्हणून अपर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेत एका पथकाची स्थापना करण्यात आली आहे.

७ सप्टेंबरला ‘युवाशक्ती दहीहंडी’चे आयोजन ! – धनंजय महाडिक, खासदार, भाजप

कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकात धनंजय महाडिक युवाशक्ती आणि भाजप यांच्या संयुक्त विद्यमाने ७ सप्टेंबरला दुपारी ४ वाजता ‘युवाशक्ती दहीहंडी’चे आयोजन करण्यात आले आहे.

कागल (जिल्हा कोल्हापूर) तालुक्यात दुष्काळ घोषित करा ! – ग्रामस्थांचे निवेदन

पावसाने ओढ दिल्याने खरीप पिके, तर जनावरांच्या लंपी आजारामुळे दुग्ध व्यवसाय धोक्यात आला आहे. शासनाने शेतकर्‍यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे रहावे, यांसाठी हेक्टरी १५ सहस्र रुपयांचे सहकार्य घोषित करावे

धरणातील उपलब्ध पाणी पिण्यासाठी आणि शेतीसाठी राखून ठेवा ! – शंभूराज देसाई

संभाव्य टंचाई पहाता धरणांतील उपलब्ध पाणीसाठा हा प्राधान्याने पिण्याच्या पाण्यासाठी आणि शेतीसाठी राखून ठेवावा, तसेच कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ठरल्याप्रमाणेच धरणांमधील पाण्याचे आवर्तन सोडावे, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

भिवंडी येथील इमारतीचा भाग कोसळून दोघांचा मृत्यू !

भिवंडी येथील गौरीपाडा भागातील एक मजली इमारतीचा काही भाग कोसळून दोघांचा मृत्यू झाला, तर ५ जणांना वाचवण्यात अग्नीशमनदलाला यश आले आहे. मृतांमध्ये ८ मासांच्या मुलीचा समावेश आहे.