प्रथम क्रमांकाला ३ लाख रुपयांचे पारितोषिक

कोल्हापूर, ३ सप्टेंबर (वार्ता.) – कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकात धनंजय महाडिक युवाशक्ती आणि भाजप यांच्या संयुक्त विद्यमाने ७ सप्टेंबरला दुपारी ४ वाजता ‘युवाशक्ती दहीहंडी’चे आयोजन करण्यात आले आहे. या दहीहंडी स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणार्या विजेत्या संघास ३ लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे, तसेच अन्य बक्षिसेही देण्यात येणार आहेत, अशी माहिती भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकार परिषदेत दिली. या प्रसंगी ‘समीट ॲडव्हेंचर’चे श्री. विनोद काम्बोज उपस्थित होते, तर ‘हिल रायडर ॲडव्हेंचर’चे कार्यकर्ते यांचा विशेष सहभाग असणार आहे.
खासदार धनंजय महाडिक पुढे म्हणाले, ‘‘या दहीहंडी पथकातील गोविंदा १४ वर्षांवरील असावा, या नियमाचे काटेकोर पालन केले जाईल. ‘स्वराज्य ढोलताशा पथक’ आणि ‘सार्थक क्रिएशन’चे सांस्कृतिक कार्यक्रमही या वेळी होणार आहेत. महिला आणि लहान मुले यांना बसण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. शासनाने या खेळाला साहसी खेळांचा दर्जा दिला असून सर्व नियमांचे पालन करून ही स्पर्धा होणार आहे. शहरात १२ ठिकाणी ‘डिजिटल स्क्रीन’ लावून याचे प्रक्षेपण केले जाणार आहे.’’
सावंतवाडी रेल्वेस्थानकात ३ एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्यास विलंब : नागरिक संतप्त
मडगाव येथे दिवसाढवळ्या डॉक्टरचे अपहरण
वाशी येथे ‘जनसंवाद-विकास’ उपक्रमात नागरिकांच्या समस्या सोडवण्यावर भर
ठाणे रेल्वेस्थानकातील उपाहारगृहांत कीड लागलेला भाजीपाला आणि काळवंडलेले तेल यांचा वापर
ऐरोली बसस्थानकात मोठ्या पावसानंतर खड्डे
टाकळी (सांगली) येथे वाढीव वर्गणी देऊनही भेडसावणार्या तीव्र पाणीटंचाईमुळे नागरिक त्रस्त !