धरणातील उपलब्ध पाणी पिण्यासाठी आणि शेतीसाठी राखून ठेवा ! – शंभूराज देसाई

पालकमंत्री शंभूराज देसाई

सातारा, ३ सप्टेंबर (वार्ता.) – जिल्ह्यात सरासरीहून अल्प पाऊस झाला आहे. संभाव्य टंचाई पहाता धरणांतील उपलब्ध पाणीसाठा हा प्राधान्याने पिण्याच्या पाण्यासाठी आणि शेतीसाठी राखून ठेवावा, तसेच कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ठरल्याप्रमाणेच धरणांमधील पाण्याचे आवर्तन सोडावे, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे कालवा सल्लागार समितीची बैठक पालकमंत्री श्री. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या वेळी ते बोलत होते. या बैठकीला सातारा जिल्ह्यातील खासदार, आमदार आणि विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.