जो धर्म समानतेचा अधिकार देत नाही, तो रोगाप्रमाणे ! – काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे पुत्र प्रियांक खर्गे

उदयनिधी यांच्या विधानावर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे पुत्र प्रियांक खर्गे यांची हिंदु धर्मावर अप्रत्यक्ष टीका !

उदयनिधी स्टॅलिन (डावीकडे) प्रियांक खर्गे (उजवीकडे)

बेंगळुरू (कर्नाटक) – माझ्या मते कोणताही धर्म तुम्हाला समान अधिकार देत नाही, मनुष्याप्रमाणे वागवत नाही, तो धर्म एखाद्या रोगाप्रमाणे आहे, असे विधान काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकाजुन खर्गे यांचे पुत्र आणि कर्नाटकचे मंत्री प्रियांक खर्गे यांनी केले आहे. ते तमिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांच्या सनातन धर्माविषयी केलेल्या विधानावरून प्रतिक्रिया व्यक्त करतांना बोलत होते.

संपादकीय भूमिका

  • उदयनिधी स्टॅलिन यांनी हिंदु धर्मातील वर्णव्यवस्थेवरून सनातन धर्माला संपवण्याचे विधान केल्याने त्यावर प्रियांक खर्गे यांची ही प्रतिक्रिया हिंदु धर्माच्याच संदर्भात आहे, हे स्पष्ट होते. इस्लाममध्ये महिलांनाही समानतेने वागले जात नाही, हे उघड असतांना खर्गे इस्लामचे नाव घेऊन असे कधीही म्हणण्याचे धाडस करणार नाहीत. तसे केल्यास काय होईल, हे त्यांना ठाऊक आहे !
  • इस्लाममध्ये अनेक जाती आहेत. शिया आणि सुन्नी यांचे वाद गल्ली, नगर, शहर, राज्य आणि देश यांमध्ये होत असतात. अहमदिया मुसलमानांना मुसलमान मानले जात नाही. अशी असमानता असतांना याविषयी मात्र एकही निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी, नास्तिकतावादी तोंड उघडत नाही कि संपवण्याची भाषा करत नाही, हे लक्षात घ्या !