कार्यालयीन वेळेत योग प्रशिक्षण घेणार्‍या वैद्यकीय अधिकार्‍यांसह ८ जणांवर दंडात्मक कारवाई !

कार्यालयीन वेळेत योग प्रशिक्षण घेणार्‍या महापालिकेच्या वाय.सी.एम्. रुग्णालयातील वैद्यकीय अधिकार्‍यांसह ८ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यांच्या वेतनातून दंडाची रक्कम वसूल करण्याचा आदेश प्रशासक शेखर सिंह यांनी दिला.

नवी मुंबईत पाणी कपातीला प्रारंभ

या वर्षी पाऊस विलंबाने येणार असल्याने राज्य शासनाच्या निर्देशानुसार नवी मुंबई महापालिकेच्या क्षेत्रात २८ एप्रिलपासून पाणीकपात लागू करण्यात आली आहे, अशी माहिती आयुक्त राजेश नार्वेकर यांनी दिली.

रस्ते काँक्रिटीकरणाचे ६ कोटी रुपये खर्चाचे काम चालू; एका वर्षात तुर्भेगाव खड्डामुक्त होणार ! – रामचंद्र घरत, जिल्हाध्यक्ष, भाजप

तुर्भे गावातील सर्व रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाच्या दुसर्‍या टप्प्यातील कामाला प्रारंभ झाला आहे. या रस्ते काँक्रिटीकरणामुळे एका वर्षात तुर्भेगाव खड्डामुक्त होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

‘महर्षि कर्वे स्त्री शिक्षण संस्थे’मुळे महिलांचे सबलीकरण ! – दत्ताजी थोरात

महर्षि धोंडो केशव कर्वे यांच्या स्त्री शिक्षणाच्या कार्यामुळे अनेक अबला महिला सबला झाल्या आहेत. त्यामुळे त्या आज विविध क्षेत्रांत उत्तुंग भरारी घेत आहेत, असे प्रतिपादन ‘महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थे’चे शाळा समिती अध्यक्ष दत्ताजी थोरात यांनी व्यक्त केले.

आत्‍मनिर्भर आणि स्‍वावलंबी भारतासाठी ‘सहकार भारती’ने पुढाकार घ्‍यावा ! – प.पू. काडसिद्धेश्‍वर स्‍वामी

राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघ विविध क्षेत्रांत अनेक संस्‍था, संघटना यांच्‍या माध्‍यमातून सामाजिक कार्य करत आहे. सहकार क्षेत्रात सहकार भारती संपूर्ण भारतात काम करत आहे. काही मूठभर लोकांमुळे सहकार चळवळ अपकीर्त झाली.

‘मिरज विद्यार्थी संघा’च्या वसंत व्याख्यानमालेस २ मेपासून प्रारंभ !

मिरज विद्यार्थी संघाच्या ९८ व्या वसंत व्याख्यानमालेस २ मेपासून प्रारंभ होत आहे. १५ मे पर्यंत चालणार्‍या या व्याख्यानमालेचे उद्घाटन २ मे या दिवशी सायंकाळी ६.४५ वाजता विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते होणार आहे.

शंकराचार्य स्वामी श्री अविमुक्तेश्वरानंद सरस्वती १००८ यांनी घेतले श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन !

बद्रिनाथ ज्योतीर्मठ येथील पीठाधीश्वर जगदगुरु शंकराचार्य स्वामी श्री अविमुक्तेश्वरानंद सरस्वती १००८ यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले.

नास्तिकतावाद्यांच्या हत्येच्या भरकटलेल्या अन्वेषणाची पोलखोल !

मागील काही वर्षांत डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, पत्रकार गौरी लंकेश आणि एम्.एम्. कलबुर्गी या नास्तिकतावाद्यांच्या गोळ्या घालून हत्या झाल्या. या चारही प्रकरणांत तपासयंत्रणांनी ज्या प्रकारे तपास केला, त्यात कुठेही ताळमेळ आणि तर्क दिसला नाही. उलट हा तपास भरकटला होता.

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जीवनचरित्र म्हणजे धगधगत्या यज्ञकुंडातील ज्वाळा ! – राहुल सोलापूरकर, ज्येष्ठ अभिनेते

‘प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी’च्या निगडीतील ‘मॉडर्न शैक्षणिक संकुला’त आयोजित वसंत व्याख्यानमालेत ‘स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जीवनचरित्र’ या विषयावर ते बोलत होते.

जलशुद्धीकरण केंद्राच्या गळती काढण्याच्या कामामुळे १ मेला पाणीपुरवठा होणार नाही !

जलशुद्धीकरण केंद्राच्या गळती काढण्याच्या कामामुळे १ मे या दिवशी पाणीपुरवठा होणार नाही, तर २ मे या दिवशी अपुरा पाणीपुरवठा होईल.