‘द बॅटल स्टोरी ऑफ सोमनाथ’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सोमनाथ मंदिरावरील गझनीच्या आक्रमणाच्या वेळी झालेल्या युद्धाचे चित्रण

सिंधुदुर्ग : मठ येथील श्री स्वयंभू मंदिरातील दानपेटी फोडून चोरी

हिंदूंची असुरक्षित मंदिरे ! मठ येथील श्री स्वयंभू मंदिरातील दानपेटी फोडून अज्ञात चोराने त्यातील रक्कम चोरल्याची तक्रार मंदिराचे पुजारी दत्ताजी रामचंद्र गुरव यांनी वेंगुर्ला पोलीस ठाण्यात दिली आहे.

बांदा (सिंधुदुर्ग) प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकार्‍यांची पदे भरा, अन्यथा आंदोलन करणार ! – शीतल राऊळ, माजी सभापती, पंचायत समिती, सावंतवाडी

जनतेच्या आरोग्याशी निगडित समस्येसाठी आंदोलनाची चेतावणी द्यावी लागणे, हे प्रशासनाला लज्जास्पद ! प्रशासनाला केवळ आंदोलनाचीच भाषा समजते का ?

गुन्हा रहित होण्यासाठी छगन भुजबळ यांच्याकडून याचिका प्रविष्ट !

देहली येथील महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात स्वतःवरील गुन्हा रहित होण्यासाठी अन्न आणि नागरी पुरवठा, तसेच ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी याचिका प्रविष्ट केली आहे.

राज्यातील आपत्तींचे व्यवस्थापन पहाणारा मंत्रालयातील विभागच आपत्तीमध्ये !

मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षामधीलही अनेक पदे रिक्त आहेत. मंत्रालयीन नियंत्रण कक्ष आणि आपत्ती व्यवस्थापन कक्ष यांतील रिक्त पदे भरण्याची मागणी या विभागांकडून करण्यात आली आहे; मात्र राज्य सरकारकडून त्याची पूर्तता करण्यात आलेली नाही.

कोंढवा येथे शिक्षिकेचा विनयभंग करणार्‍या ३ धर्मांधांवर गुन्हा नोंद !

कोंढव्यातील शाळेच्या मालमत्तेवरून दोन प्राचार्य आणि त्यांचा भाऊ जुबेर यांच्यात वाद चालू आहे. सकाळी शिक्षिका शाळेत जात असतांना जुबेर याने त्यांचा हात पकडून लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले, तसेच इतरांनी ‘शाळेत जायचे नाही, नाहीतर आम्ही तुला मारणार’, अशी धमकी दिली.

समान नागरी कायद्याशी धर्माचा संबंध जोडणे योग्य नाही ! – मोनिका अरोरा, अधिवक्ता, सर्वोच्च न्यायालय

प्रत्येकाला स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता आणि स्वाभिमानी जीवन जगण्याचे अधिकार घटनेने दिले असल्याचे मत सर्वोच्च न्यायालयातील अधिवक्त्या मोनिका अरोरा यांनी व्यक्त केले. येथे संभाव्य ‘समान नागरी कायदा’ या विषयावर अधिवक्त्या मोनिका अरोरा यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी त्या बोलत होत्या.

संत चरित्र आणि विचारांची चुकीच्या पद्धतीने मांडणी करत भारतीय संस्कृतीला संकटात आणण्याचे प्रयत्न ! – धनंजय देसाई, हिंदु राष्ट्र सेना

संत चरित्र आणि संत विचारांची चुकीच्या पद्धतीने, लबाडीने मांडणी करत भारतीय संस्कृती, सभ्यतेला संकटात आणण्याचे प्रयत्न सध्या खेडोपाडी चालू आहेत. हे रोखण्यासाठी वारकरी कीर्तनकारांनी समाजात जाऊन वर्ग घेत स्वत:ची आध्यात्मिक भूमिका समाजासमोर मांडावी, असे आवाहन हिंदू राष्ट्र सेनेचे संस्थापक धनंजय देसाई यांनी वारकरी संप्रदायाला केले.

नियमांचे उल्लंघन केल्यामुळे ‘महाराष्ट्र परिचर्या परिषदे’चे विसर्जन !

मनुष्यबळ आणि वित्तीय साधने यांचा अपव्यय, तसेच अन्य शासकीय नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी राज्यशासनाने ‘महाराष्ट्र परिचर्या परिषद’ तडकाफडकी विसर्जित केली आहे. नव्याने स्थापना होईपर्यंत या परिषदेवर ‘प्रशासक’ म्हणून जे.जे. रुग्णालयातील साहाय्यक प्राध्यापक डॉ. अनंत शिनगारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  

२२ लाख रुपये बुडण्याच्या धास्तीने लाडगाव (छत्रपती संभाजीनगर) येथील शेतकर्‍याची आत्महत्या !

२०० कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणी वादग्रस्त ठरलेल्या ‘आदर्श नागरी सहकारी पतसंस्थे’तील आपल्या कुटुंबियांची २२ लाख रुपयांची ठेव बुडाल्याच्या भीतीने रामेश्वर इथर (वय ३८ वर्षे) या तरुण शेतकर्‍याने गळफास घेऊन आत्महत्या केली.