वारकरी संप्रदायातील ‘भक्तीशक्ती संघ’ आयोजित पुणे येथील मासिक वद्य एकादशी भजन महोत्सव
पुणे – संत चरित्र आणि संत विचारांची चुकीच्या पद्धतीने, लबाडीने मांडणी करत भारतीय संस्कृती, सभ्यतेला संकटात आणण्याचे प्रयत्न सध्या खेडोपाडी चालू आहेत. हे रोखण्यासाठी वारकरी कीर्तनकारांनी समाजात जाऊन वर्ग घेत स्वत:ची आध्यात्मिक भूमिका समाजासमोर मांडावी, असे आवाहन हिंदू राष्ट्र सेनेचे संस्थापक धनंजय देसाई यांनी वारकरी संप्रदायाला केले. आळंदी (ता. खेड) वारकरी संप्रदायातील भक्तीशक्ती संघ आयोजित मासिक वद्य एकादशी भजन महोत्सवाच्या कार्यक्रमात हिंदु राष्ट्र सेनेचे संस्थापक अध्यक्ष धनंजय देसाई यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी देसाई बोलत होते. धनंजय देसाई यांना ‘ज्ञानेश्वरी’ देऊन सन्मानित करण्यात आले. या वेळी गायक अवधूत गांधी, नीलेश बोरचटे आदींसह वारकरी संप्रदायातील मंडळी उपस्थित होती.
देसाई पुढे म्हणाले की,
१. वारकरी संप्रदायाची चिकाटी आणि चिवटपणामुळे भारतीय संस्कृती अन् परंपरा टिकून आहे.
२. धर्माची मांडणी करतांना भौतिक जीवनात आध्यात्मिक जीवनाची सांगड घालता आली पाहिजे. गाथेवर बोलतांना छत्रपती शिवरायांचे जीवन चरित्र सांगता आले पाहिजे. महाराष्ट्रभर जातीवर आधारित संघटन होत आहे. समाजाचे चिंतन करून कीर्तनकारांचे वर्ग घेतले पाहिजेत.