उदयनिधी यांच्यावर गुन्हा नोंदवण्यासाठी कल्याण येथे उपोषण !

हिंदुबहुल देशात अशी मागणी का करावी लागते ?

वाडा (पालघर) येथे गोतस्करांचे पोलिसांवर आक्रमण !

गोवंश हत्याबंदीचा कायदा असतांना गोतस्करांचे पोलिसांवर आक्रमण करण्याचे धैर्य होते, हे पोलिसांना लज्जास्पदच ! आतापर्यंत गोतस्करांना कठोर शिक्षा न झाल्याचाच हा परिणाम आहे !

‘ऑल इन वन गुरुजी’ या संस्थेकडून श्री गणेशचतुर्थीला ‘ऑनलाईन’ श्री गणेशपूजेचे विनामूल्य आयोजन !

‘ऑल इन वन गुरुजी’ या ‘यूट्यूब’ वाहिनीवरून श्री गणेशचतुर्थीच्या दिवशी म्हणजे १९ सप्टेंबरला मराठी आणि हिंदी या भाषांतून विविध मुहुर्तांच्या वेळेत श्री गणेशपूजा आणि प्राणप्रतिष्ठा यांचे पारंपरिक पद्धतीने थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.

कुणाच्या बापाचे धाडस आहे, जो हिंदु धर्म नष्ट करू शकेल ! – फडणवीस, उपमुख्यमंत्री

देशावर ज्यांनी आक्रमण केले, ते संपले; पण हिंदु धर्म कधी संपला नाही. कुणाच्या बापाचे धाडस आहे, जो हिंदु धर्म नष्ट करू शकेल ! द्रमुकचे नेते उदयनिधी स्टॅलिन जर हिंदु धर्म संपवण्याची भाषा करत असतील, तर त्यांना त्यांची जागा दाखवावी लागेल,..

मुलांमध्ये अल्कोहोल सेवनापेक्षाही अमली पदार्थांचे व्यसन करण्याचे प्रमाण अधिक !

मुलांना धर्मशिक्षण दिल्यास त्यांचे विचार प्रगल्भ होतील आणि त्यांना योग्य-अयोग्य यांची जाण वेळीच येईल. त्यामुळे ते केवळ भ्रमणभाषचा वापर करण्याऐवजी मैदानी खेळ खेळण्याकडेही लक्ष देतील, हे नक्की !

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील समस्यांविषयीचे मनसेचे आजचे आंदोलन स्थगित

‘श्री गणेशचतुर्थीपूर्वी मनसेच्या सर्व सूचनांवर कार्यवाही करण्यात येईल’, असे आश्वासन अधिकार्‍यांनी दिल्याने प्रशासनाच्या विनंतीनुसार ११ सप्टेंबर या दिवशीचे नियोजित आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे.

मुंबईत जात प्रमाणपत्र विलंबाने देणार्‍या शासकीय अधिकार्‍याला ३ लाख रुपयांचा दंड !

जातीचे प्रमाणपत्र वेळेत न मिळाल्यामुळे विद्यार्थिनीला विद्यापिठात प्रवेश घेता आला नाही. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने जात पडताळणी समितीच्या अध्यक्षांना उत्तरदायी ठरवून त्यांच्या वेतनातून ३ लाख रुपये दंड पीडित विद्यार्थिनीला देण्याची शिक्षा दिली.

नैसर्गिक जलक्षेत्रात श्री गणेशमूर्ती विसर्जन करण्यास आठकाडी आणू नये !

गेल्या काही वर्षांपासून महापालिका प्रशासन कोल्हापूर येथे पंचगंगा नदीवर ‘बॅरिकेट्स’ लावून श्री गणेशमूर्ती विसर्जन करण्यास बंदी करते, तसेच जिल्ह्यातही अनेक ठिकाणी विसर्जनास बंदी केली जाते.

किर्लोस्करवाडी (जिल्हा सांगली) येथील रेल्वेस्थानकात सुविधा द्या ! – किर्लाेस्करवाडी रेल्वे प्रवासी संघटना 

सांगली जिल्ह्यातील ३० हून अधिक गावांसाठी, तसेच पलूस, तासगाव, कडेपूर, खानापूर आणि वाळवा या तालुक्यांतील गावांसाठी किर्लोस्करवाडी हे नजीकचे अन् सोयीचे रेल्वेस्थानक आहे. सद्यःस्थितीत या स्थानकावर केवळ २ ‘पॅसेंजर’ आणि ३ जलद (एक्सप्रेस) गाड्यांना थांबा आहे. अ

गणेशोत्सवात आवाजाची मर्यादा पाळण्याची पोलीस आयुक्तांची गणेशोत्सव मंडळांना सूचना !

गणेशोत्सव मंडळांनी ध्वनीवर्धक यंत्रणा लावतांना विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि इतर यांचा विचार करावा. आवाजाने कुणालाही त्रास होऊ नये, याची दक्षता घ्यावी.