जयपूरच्या धर्तीवर शहरातील ऐतिहासिक वास्तूंना विद्युत् रोषणाई करा !- दीपक केसरकर, पालकमंत्री, कोल्हापूर

जयपूरच्या धर्तीवर शहरातील ऐतिहासिक वास्तूंना विद्युत् रोषणाई करावी आणि शहर आकर्षक होण्यासाठी प्रयत्न करावेत.

कुणाला काही अल्प पडू नये, अशी मागणी श्री महालक्ष्मीदेवीकडे केली ! – सौ. पंकजा मुंडे-पालवे

कुणाला काही अल्प पडू नये, कुणी उपाशी राहू नये, आपल्या द्वारात कोणी आला, तर त्याला रिकाम्या हाताने पाठवायला लागू नये, अशी प्रार्थना मी श्री महालक्ष्मीदेवीकडे केली आहे, अशी माहिती भाजपच्या माजी मंत्री सौ. पंकजा मुंडे-पालवे यांनी पत्रकारांना दिली.

मराठ्यांना सरसकट कुणबी आरक्षण दिल्‍यास तांत्रिकदृष्‍ट्या टिकणार नाही ! – गिरीश महाजन, मंत्री

कुणबी समाज वेगवेगळ्‍या भागांत असून मराठवाड्यातील निजाम काळातून वेगळे झाल्‍यानंतर समाज ‘कुणबी मराठा’ झाला. आता ते मागणी करतात की, संपूर्ण राज्‍यातील मराठा समाजाला ‘कुणबी’ म्‍हणून दाखला द्यावा; मात्र हे कायद्याच्‍या चौकटीत बसणार नाही.

महाराष्‍ट्राचा मणीपूर करायचा नसेल, तर मराठ्यांना आरक्षण द्या !

महाराष्‍ट्र राज्‍य पुष्‍कळ मोठे असून मणीपूर लहान राज्‍य आहे, हे लक्षात ठेवा. सरकारने सर्वपक्षीय बैठकीत मराठ्यांना आरक्षण देण्‍याचा निर्णय घ्‍यावा. अन्‍यथा महाराष्‍ट्राचा मणीपूर झाल्‍याविना रहाणार नाही.

स्‍वामी विवेकानंद यांचे मानवतावादी विचार महत्त्वाचे ! – चारुदत्त आफळे, राष्‍ट्रीय कीर्तनकार

स्‍वामी विवेकानंद यांनी मूर्तीपूजेचे स्‍तोम माजवले नाही; पण मानवतेकडे दुर्लक्ष करू नये, हे सांगितले आहे. स्‍वामी विवेकानंदांचे मानवतावादी विचार महत्त्वाचे आहेत, असे प्रतिपादन ज्‍येष्‍ठ कीर्तनकार चारुदत्त आफळे यांनी केले.

नाले बांधण्यासाठी सोलापूर महापालिकेला ९७ कोटी रुपये संमत !

शहरातील पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी खुले असलेले नाले नव्याने बांधण्यासाठी शासनाने महापालिकेला ९७ कोटी २२ लाख रुपये संमत केले आहेत.

अधिक बसभाडे आकारणार्‍या १२ खासगी बसगाड्यांवर दंडात्‍मक कारवाई !

मागील ३ दिवसांपासून प्रादेशिक परिवहन विभागाने (आर्.टी.ओ.) महामार्गावर खासगी बसची पडताळणी चालू केली आहे. यात २७ बसगाड्यांपैकी १२ बसधारक अतिरिक्‍त भाडे आकारणी करत असल्‍याचे निदर्शनास आले.

सोलापूर येथील व्‍यापार्‍याची ५० लाख रुपयांची फसवणूक !

येथील शेळगी परिसरातील एका व्‍यापार्‍याची ५० लाख रुपयांची फसवणूक केल्‍याप्रकरणी एम्. मुस्‍तफा आणि अली जिन्‍ना (राजा) यांच्‍याविरुद्ध जेलरोड पोलीस ठाणे येथे गुन्‍हा नोंद करण्‍यात आला आहे

ठाणे येथे उद़्‍वाहनाचा दोर तुटून ७ कामगारांचा मृत्‍यू !

येथील बाळकुम परिसरात असलेल्‍या रुणवाल आयरीन या ४० मजली इमारतीचे बांधकाम नुकतेच पूर्ण झाले आहे. इमारतीच्‍या छतावर जलरोधकासाठी (‘वॉटरप्रूफिंग’चे) काम चालू होते.

सातारा शहराच्‍या विस्‍तारित भागासाठी ७०० पथदीप प्रस्‍तावित !

नागरिकांना पायाभूत सुविधा देण्‍याच्‍या दृष्‍टीकोनातून शहराच्‍या विस्‍तारित भागासाठी ७०० पथदीप नवीन खांबांसह बसवण्‍यात येणार आहेत. यासाठी सातारा नगरपालिकेने २ कोटी ४८ लाख रुपयांचा प्रस्‍ताव सिद्ध केला आहे.