माजी नगरसेविका स्मिता आष्टेकर आणि मनसेच्या अधिवक्त्या अनिता दिघे यांचे सुषमा अंधारे यांच्यावर आरोप !

सुषमा अंधारे यांनी स्वत:च्या जुन्या भाषणात हिंदु देवतांविषयी अपशब्द वापरल्याने मी त्यांचा निषेध केला असून त्यांनी पुन्हा नगरमध्ये येऊन दाखवावे, त्यांना मी माझा हिसका दाखवल्याविना रहाणार नाही, अशी चेतावणी शिवसेनेच्या माजी जिल्हाध्यक्षा, माजी नगरसेविका स्मिता आष्टेकर यांनी दिली आहे.

दुधाळी नाल्याचे सांडपाणी पंचगंगा नदीत मिसळल्याने मोठ्या प्रमाणात प्रदूषण ! – सुशील भांदिगरे, पंचगंगा विहार मंडळ

दायित्वशून्य महापालिका प्रशासन आणि प्रदूषण मंडळ !

पंचगंगा नदीवर वळीवळे बंधार्‍याजवळ सहस्रो मासे मृत्यूमुखी : मासे घेऊन जाण्यासाठी नागरिकांची झुंबड !

केवळ हिंदूंच्या सणांना कार्यरत होणारे आणि वर्षभर झोपा काढणारे प्रदूषण नियंत्रण मंडळ !

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्‍याला अटक !

पालकांनो, काळाची दुःस्थिती लक्षात घेता आपल्या मुलींना कुणीही एकटे बोलावल्यावर त्यांच्याकडे न जाण्याविषयी सतर्क करा !

महापालिकेला हरित न्यायालयाने ९० कोटी रुपयांचा दंड ठोठावला !

कृष्णा नदीत सांडपाणी आणि कारखान्यांचे रसायनयुक्त पाणी सोडून पाणी प्रदूषित होऊन लाखो माशांचा मृत्यू झाला होता.

पुणे महापालिकेतील आरोग्य अधिकारी डॉ. आशिष भारती यांना अटकपूर्व जामीन संमत !

कोरोना महामारीच्या काळामध्ये वारजे येथील कै. अरविंद बारटक्के रुग्णालयामध्ये कोरोना चाचणी (अँटिजेन) किट, अन्य वैद्यकीय साहित्य यांची खासगी रोगनिदान केंद्रचालकांना परस्पर विक्री केली.

राज्यभर शिवजयंती उत्साहात साजरी !

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती  भारतभर साजरी केली जाते. १९ फेब्रुवारी या दिवशी छत्रपती शिवरायांची दिनांकानुसार जयंती होती.

जिना तोडल्याची पूर्वसूचना न दिल्याने प्रवाशांची फरपट !

डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक १, १ अ वरील एक जिना दुरुस्तीच्या कामासाठी रेल्वे प्रशासनाने १ आठवड्यापूर्वी तोडला आहे. यामुळे प्रवाशांना वळसा घेऊन फलाटावर यावे लागते.

रस्त्याच्या कामात सापडले पेशवेकालीन जलवाहिनी उच्छ्वास !

महापालिकेच्या पथ विभागाच्या वतीने ट्रेझर पार्क ते शिवदर्शनपर्यंत रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण केले जाणार आहे. त्यासाठी जेसीबीने रस्ता खोदत असतांना रस्त्याच्या मध्यभागी पेशवेकालीन जलवाहिनीचा उच्छ्वास सापडला आहे.

नवी मुंबईकरांवर कोणतीही करवाढ लादू नये ! – आमदार गणेश नाईक, भाजप

नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर येत्या काही दिवसांत २०२४-२५ चा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पामध्ये नवी मुंबईकरांवर कोणताही करवाढ नये, अशी सूचना भाजपचे आमदार गणेश नाईक यांनी राजेश नार्वेकर यांच्याकडे केली आहे.