जर्मनीच्या खोट्या व्हिसा प्रकरणी प्रवाशावर गुन्हा नोंद !

मुंबई – तेलंगाणातील एजंट इमादी राजन्ना याने जर्मनी देशाचा खोटा व्हिसा दिल्याने एक प्रवासी मुंबई विमानतळावर अडकला. या प्रकरणी मुंबई विमानतळ प्रशासनाने राजन्नावर गुन्हा नोंदवला आहे. त्याने तेलंगाणा राज्यातील साईतेज रामाअगडू या एजंटकडून व्हिसा काढला होता. राजन्ना याला युरोपमध्ये स्थायिक व्हायचे होते.