हिंदु नववर्ष स्वागतासाठी लोणावळा (पुणे) येथे भव्य दुचाकी शोभायात्रा !

लोणावळा (जिल्हा पुणे) – गुढीपाडवा अर्थात् हिंदु नववर्ष स्वागतासाठी येथे हिंदु समिती लोणावळा शहर आणि ग्रामीण यांच्या वतीने भव्य शोभायात्रेचे आयोजन केले होते. दीड सहस्र दुचाकींवरून साडेतीन सहस्र हिंदु बंधू-भगिनी यात सहभागी झाले होते. अनेकांनी श्रीराम, लक्ष्मण आणि सीता यांची वेशभूषा परिधान केली होती. अयोध्या येथील श्रीराम मंदिराची प्रतिकृती, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा रथ या शोभायात्रेत होता. लहान मुले, महिला, युवक, तरुण आणि ज्येष्ठ सर्वच जण या शोभायात्रेत सहभागी झाले होते.