राज्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता !

मुंबई – हवामान विभागाने मुसळधार पावसाचा ‘रेड अलर्ट’ दिला आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांत वादळी वार्‍यासह गारपीट होणार आहे. ५० ते ६० किमी प्रतितास वेगाने वारे वहाण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

राज्यात काही ठिकाणी गारपीट झाल्याने पिकांची हानी झाली. आंबा, लिंबू, भाजीपाला, ज्वारी या पिकांची हानी झाली. काही ठिकाणी वीज पडली.