भारत खरोखरच जगाचा विश्‍वगुरु ! – युक्रेनच्या उपपरराष्ट्रमंत्री एमीन झापरोवा

आज भारताला विश्‍वगुरु, वैश्‍विक शिक्षक आणि मध्यस्थ बनण्याची अवश्यकता आहे. युक्रेनला पाठिंबा देणे, हा खर्‍या ‘विश्‍वगुरु’साठी योग्य पर्याय आहे, असेही झापरोवा यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान मोदी महत्त्वाच्या सूत्रांविषयी गप्प ! – सोनिया गांधी

त्यांच्या सरकारच्या कामाचा कोट्यवधी लोकांच्या जीवनावर परिणाम होतो. याविषयी काँग्रेसचे प्रश्‍न न्यायोचित आहेत. त्याविषयी ते मौन बाळगून आहेत, अशी टीका काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी एका वृत्तपत्रात लिहिलेल्या लेखाद्वारे केली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ‘राष्ट्रीय’ पक्ष म्हणून दर्जा रहित !

केंद्रीय निवडणूक आयोगाने शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ‘राष्ट्रीय’ पक्ष म्हणून असलेला दर्जा रहित केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा राष्ट्रीय पक्ष म्हणून आवश्यक असलेल्या गोष्टींची पूर्तता करत नसल्याने हा दर्जा काढून घेण्यात आला आहे.

रमझान मासात ‘वजू’ करण्याची मागणी : १४ एप्रिलला सुनावणी

काही मासांपूर्वी ज्ञानवापी मशिदीच्या करण्यात आलेल्या सर्वेक्षणात ‘वजू’च्या ठिकाणी शिवलिंग सापडले होते. तेव्हापासून ज्ञानवापीत ‘वजू’ करण्याच्या परिसराला टाळे ठोकण्यात आले आहे. 

एअर इंडियाच्या विमानात प्रवाशाची कर्मचार्‍यांना मारहाण

देहलीहून लंडनला जाणार्‍या ‘एआय-१११’ विमानात एका प्रवाशाचा कर्मचार्‍याशी वाद झाला. प्रवाशाने कर्मचार्‍यांना मारहाण केली. यात २ कर्मचारी घायाळ झाले.

भारताने ब्रिटनशी व्यापाराविषयीची चर्चा थांबवल्याचे वृत्त निराधार ! – भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून स्पष्टीकरण

खलिस्तान्यांनी लंडन येथील भारतीय उच्चायुक्तालयावर आक्रमणावेळी ब्रिटनचे पोलीस संरक्षण करण्यात अपयशी ठरले होते. यामुळेच भारताने ब्रिटनशी व्यापाराविषयीची चर्चा थांबवल्याचे वृत्त काही विदेशी माध्यमांनी प्रसारित केले होते. 

भ्रष्टाचाराविषयीचा अहवाल एका मासात पाठवा ! – केंद्रीय दक्षता आयोग

भ्रष्टाचार अल्प करण्याविषयी सर्वच स्तरावर अनास्था असल्यामुळे अशा सूचना द्याव्या लागतात’, अस कुणाला वाटल्यास चूक ते काय ?

राहुल गांधी यांचे विदेशातील नको त्या उद्योगपतींशी संबंध ! – काँग्रेसचे माजी नेते गुलाम नबी आझाद यांचा दावा

आझाद पुढे म्हणाले की, ‘भारत जोडो’ यात्रेनंतर राहुल गांधी यांचा प्रभाव वाढला, असे अनेक जण म्हणतात; मात्र मला असे वाटत नाही; कारण राहुल गांधी जेव्हा सुरत न्यायालयात गेले, तेव्हा त्यांच्यासमवेत एकही तरुण किंवा शेतकरी नव्हता.

भाजप कव्वालीच्या माध्यमातून सरकारची कामे मुसलमानांपर्यंत पोचवणार !

भाजपने मुसलमानांना कितीही जवळ केले, तरी ते भाजपला मते देणार नाहीत. त्यामुळे भाजपने हिंदूंना जवळ करून त्यांचा विश्‍वास संपादन केल्यास हिंदू भाजपला भरघोस मतांनी निवडून देतील, हे निश्‍चित !