रमझान मासात ‘वजू’ करण्याची मागणी : १४ एप्रिलला सुनावणी

ज्ञानवापी प्रकरण

(‘वजू’ म्हणजे नमाजापूर्वी हात-पाय धुण्याची जागा)

नवी देहली – रमझान मासात ज्ञानवापीच्या परिसरात ‘वजू’ करण्याची मागणी ‘अंजुमन इंतेजामिया मशीद समिती’ने सर्वोच्च न्यायालयात एका याचिकेद्वारे केली. या याचिकेवर १४ एप्रिलला न्यायालयात सुनावणी होणार आहे.

काही मासांपूर्वी ज्ञानवापी मशिदीच्या करण्यात आलेल्या सर्वेक्षणात ‘वजू’च्या ठिकाणी शिवलिंग सापडले होते. तेव्हापासून ज्ञानवापीत ‘वजू’ करण्याच्या परिसराला टाळे ठोकण्यात आले आहे.