भ्रष्टाचाराविषयीचा अहवाल एका मासात पाठवा ! – केंद्रीय दक्षता आयोग

केंद्रीय दक्षता आयोगाची सूचना

नवी देहली – केंद्रीय दक्षता आयोगाने बँका, विमा कंपन्या आणि सरकारी विभाग यांना भ्रष्टाचाराच्या तक्रारींविषयी तथ्यात्मक अहवाल एका मासात सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. केंद्रीय दक्षता आयोगाच्या अधिकार्‍यांनी सांगितले की, भ्रष्टाचाराच्या तक्रारींवर वेळेवर कारवाई करणे आणि अवास्तव विलंब रोखणे हे या निर्णयाचे उद्दिष्ट आहे.
दक्षता आयोगाच्या अधिकार्‍यांना तक्रारी प्राप्त झाल्यानंतर ३० दिवसांच्या आत तक्रारींच्या संदर्भातील कागदपत्रांची पडताळणी करून सरकारला अहवाल सादर करणे बंधनकारक असते. हा अहवाल सादर करतांना केंद्रीय दक्षता आयोगाच्या अधिकार्‍यांना त्यांचे मत अथवा त्याविषयीच्या मागणीची प्रत सोबत जोडणे आवश्यक असते.

संपादकीय भूमिका 

भ्रष्टाचार अल्प करण्याविषयी सर्वच स्तरावर अनास्था असल्यामुळे अशा सूचना द्याव्या लागतात’, अस कुणाला वाटल्यास चूक ते काय ?