बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी धर्मांधांची तळी उचलण्यासाठी स्वप्रतिष्ठेचा प्रश्न बनवत ‘द बंगाल फाइल्स’ या चित्रपटाला विरोध केला; मात्र हा चित्रपट ५ सप्टेंबर या दिवशी बंगाल वगळता जभगरात प्रदर्शित झाला. भारतीय चित्रपटसृष्टीने आजवर दडपलेली ‘दंगलीतील हिंदूंची होरपळ, सत्तालोलूपतेपायी शासनकर्ते करत असलेली धर्मांधांची लाचारी यांसह धर्मांध मुसलमानांची भूतकाळातील क्रूरता, वर्तमानकाळातील खूनशीपणा आणि भविष्यकाळातील राक्षसी योजना अशी सत्य घटनांवर आधारित वास्तववादी सूत्रे या चित्रपटाने जगासमोर आणली आहेत. या सर्व दुःस्थितीवरील उपाययोजनाही चित्रपटात दाखवल्या आहेत. त्यामुळे या चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री यांनी म्हटल्याप्रमाणे ‘हा चित्रपट सर्वसामान्य नागरिकांच्या मनात खोलवर परिणाम करून त्याच्यामध्ये राष्ट्रभक्ती जागृत करणे’, यात हा चित्रपट यशस्वी झाला आहे. या चित्रपटाचे परीक्षण ‘सनातन प्रभात’च्या वाचकांसाठी श्री गुरुचरणी अर्पण करत आहे.
संकलक : श्री. सागर निंबाळकर, कोल्हापूर
१. चित्रपटाची सत्यघटनांवर आधारित कथा थोडक्यात अशी !
गीता मंडल या मागासवर्गीय तरुणीच्या अपहरणाच्या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी शिवा पंडित हा ‘केंद्रीय अन्वेषण यंत्रणे’चा पोलीस अधिकारी बंगालमध्ये जातो. स्थानिक राजकारणी सरदार हुसैनी याच्या उद्दाम धर्मांधतेला तोंड देतांना त्याला न्यायासाठी अत्यंत घृणास्पद वागणुकीला सामोरे जावे लागते. या प्रकरणातील एक संशयित आरोपी आणि एकमेव साक्षीदार असलेल्या भारती बॅनर्जी यांना समजून घेतांना त्यांच्या भूतकाळाचा उलगडा शिवा यांना होतो. भारती यांनी भारताच्या फाळणीच्या काळात अनुभवलेला राष्ट्रीय नेत्यांचा बोटचेपेपणा, हिंदूघातकी अहिंसा, हिंदूद्रोही गांधीगिरी, गांधींच्या घोडचुका, बंगालच्या धर्मांधांचे क्रौर्य, हिंदूंचा नियोजनबद्ध केलेला वंशसंहार आणि या सगळ्या वादळातही भारती यांनी प्राणपणाने जपलेली राष्ट्रभक्ती, अशी काळीज पिळवटून टाकणारी कथा या चित्रपटात दर्शवली आहे.
चित्रपटातील अंतर्मुख करणारे काही संवाद !

१. भारती बॅनर्जी : ‘जिस सरकारने मेरी भारतमां को अपने तानाशाही के जुतों से कुचला हो, जो भारतमां इस सरकारके निर्दयी अत्याचारों से थर्रा रही हो, क्या ऐसे में उसकी बेटी को चुप रहना चाहीए ? भारत की बेटी हूं, भारत के लिए मरूंगी भी और मारूंगी भी ।’
२. जिना : हिंदु और मुस्लिम कभी एक नहीं हो सकते । हमारे बिलीफ्स, हिरोज्, व्हिलन्स अलग है । आपका कल्चर संस्कृत से निकलता है । हमारा अरबी-फार्सी से । आप आत्मा और पुनर्जन्म मे विश्वास रखते है । हम नहीं रखते । हिंदुस्थान को आप अपनी मां मानते है, हम नहीं मानते है । आप वेदों को मानते है, हम कुरान को मानते है । आप लाखों भगवान को मानते है । हम सिर्फ अल्ला को मानते है । ‘हिंदु-मुस्लिम युनिटी’ एक झूठ है ।
३. पाठा : गांधी रामराज्य बनाना चाहता है । जाओ पुछो गांधी से, क्या रावण को मारे बगैर रामराज्य बन सकता है ? तो अब क्या करना होगा ? अब लडना होगा । शत्रू का पूर्ण विनाश करना होगा । सारे हिंदुओं को जोडना होगा ।
४. गांधी : हिंदु महिलाओं को अपनेआप को असहाय या कमजोर नहीं समझना चाहीए । अगर कोई भी रावण किसी भी महिला के एक भी बाल को हाथ लगाता है तो, उस महिला को आत्महत्या कर लेनी चाहीए । वो अपने जीभ को काटकर या सांस रोखकर अपने प्राणों को त्याग सकती है । वही असली साहस है ।
– श्री. सागर निंबाळकर
२. प्रेक्षकांच्या डोळ्यांत अंजन घालणारे प्रसंग !
अ. नौआखाली, कोलकाता आणि संपूर्ण बंगालच पाकिस्तानमध्ये यावे, यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री हुसेन शाहीद सुर्हावर्दी याने १६ ऑगस्ट १९४६ या दिवशी ‘डायरेक्ट ॲक्शन डे’ची (थेट कृतीच्या दिवसाची) घोषणा केली. तो दिवस रमजानचा १८ वा दिवस होता आणि याच दिवशी महंमद याने बद्र येथील लढाई जिंकली होती, यांचे निमित्त त्यांनी साधले होते. त्यामुळे सुर्हावर्दी यांनी १६ ऑगस्टपूर्वीच पोलिसांना दंगलखोर मुसलमानांवर कोणतीही कारवाई न करण्याचे आदेश दिले होते. धर्मांधांना बंदुकांसह सर्व प्रकारची शस्त्रे पुरवली होती. धर्मांध गुंडांचेही साहाय्य घेतले होते. कुणीही हिंदू वाहनाने पळून जाऊ नयेत, यासाठी पेट्रोलपंप चालवणार्यांना ‘केवळ कूपन असणार्यांना पेट्रोल द्या’, असे सांगितले होते, तर कूपन देणार्यांना ‘कोणत्याही हिंदूला कूपन देऊ नये’, अशा सूचना केल्या होत्या. मोकाट सुटलेले राक्षसी धर्मांध मुसलमान हिंदूंची कत्तल करत होते; मात्र त्यांना असंघटित हिंदू रोखू शकले नाहीत. तेव्हा हिंदूंचे नेते गोपाल पाठा यांच्या नेतृत्वाखाली संघटित हिंदूंनी केलेला प्रतिकार या चित्रपटात दर्शवला आहे. बंगालमधील या दंगलीत २० सहस्र हिंदूंची अक्षरशः कत्तल झाली, तर १ लक्ष हिंदू घायाळ झाले. यातून धर्मांध मुसलमानांची दंगलीची नियोजनबद्धता, दंगलीची जीवघेणी दाहकता आणि दंगलकाळात हिंदूंनी संघटित होऊन प्रतिकार करण्याची आवश्यकता प्रेक्षकांच्या मनावर खोलवर ठसवण्यात दिग्दर्शक यशस्वी झाले आहेत.
आ. या चित्रपटात मोहनदास गांधी आणि बॅरिस्टर जिना यांच्याशी संबंधित अगदी मोजके प्रसंग; पण ते अत्यंत परिणामकारकरित्या दर्शवले आहेत. गांधी सतत जिना यांचा उल्लेख ‘मेरे भाई जिना’ म्हणून करतात; मात्र जिना गांधींना, म्हणजेच हिंदूंना त्यांची जागा दाखवतांना माघार घेत नाहीत. हिंदू-मुसलमान यांच्यातील भेद पटवून देऊन जिना गांधींना निरुत्तर करतात.
प्रेक्षकांच्या निर्भयतेची कसोटी पहाणारे काही प्रसंग !

१. दंगलींमध्ये अचानक धर्मांध मुसलमानांनी हिंदूंवर आक्रमणे करणे
२. दंगलग्रस्त हिंदु बालकाने त्याच्या वडिलांचा घाम पाणी म्हणून पिणे
३. जिवंत हिंदूच्या शरिराला वाळलेला चारा बांधून धर्मांधांनी पेटवणे
४. हिंदूंचे देह पशूवधगृहातील मांस अडकवण्याच्या ‘हुकां’ना अडकवणे
५. हिंदूंच्या मृतदेहांचे खच पडलेले असणे
६. मृत हिंदूच्या अंत्यविधीसाठी लाकडे अल्प पडल्याने त्यांचे एकत्रित दहन करावे लागणे
७. एका हिंदूचे मस्तक देवीच्या मूर्तीसमोर छाटणे, देवीच्या मूर्तीसमोर हिंदूंच्या हत्या करणे, एका हिंदूचे दोन उभे तुकडे करणे इत्यादी
८. हिंदु न्यायाधिशाने ज्या धर्मांध नेत्यास जामीन मिळवून दिला, त्यानेच त्या न्यायाधिशाला भर चौकात सर्व धर्मांधांसमोर ठेचून मारणे
९. हिंदु महिलेच्या देहाची सहस्रो धर्मांधांनी विटंबना करणे
१०. धर्मांध आमदारासमोर वरिष्ठ पोलीस अधिकार्याला त्याच्या म्हणण्यानुसार अत्यंत अवमानकारक पद्धतीने क्षमायाचना करावी लागणे.
– श्री. सागर निंबाळकर
इ. भारती बॅनर्जी या इंग्रज अधिकार्याकडून पदवी स्वीकारण्याऐवजी त्यांची भर कार्यक्रमात हत्या करतात. त्यांचे मतपरिवर्तन करून गांधी त्यांना अहिंसावादी बनवतात; मात्र अहिंसावाद जिवावर उठतो अन् भारती यांना स्वसंरक्षणासाठी शस्त्र उचलावेच लागते. यातून ‘अहिंसावादासह निधर्मीवादाची निरर्थकता’ही स्पष्ट करण्यात आली आहे.
ई. या चित्रपटात मिथुन चक्रवर्ती यांनी एका वेड्या व्यक्तीची भूमिका केली आहे. ही व्यक्ती तिच्या उमेदीच्या काळात निर्भय पोलीस अधिकारी असते. धर्मांध नेत्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी तो अधिकारी पुरावे जमवत असतो; मात्र हे लक्षात आल्यावर धर्मांधांनी त्यांची जीभ आणि गुप्तांग कापलेले असते. त्यामुळे त्यांचे पूर्ण जीवन नरकमय झाले असते. यावरून धर्मांधांचे टोकाचे क्रौर्य प्रेक्षकांच्या लक्षात येते.

उ. धर्मांधांची दंगल घडवण्याच्या सिद्धतेमुळे त्यांच्यासमोर स्थानिक पोलीस यंत्रणाच नव्हे, तर केंद्रीय अन्वेषण विभागाचे उच्चपदस्थ अधिकारीही हतबल आणि लाचार झाल्याचे या चित्रपटात दर्शवले आहे. ते अधिकारी आणि एकूणच प्रशासकीय यंत्रणा कोणत्याही प्रामाणिक पोलिसाला इच्छा असूनही कारवाई करू देत नाहीत. यामुळे सध्या जे चित्रपट निर्माते निर्भय (?) पोलीस अधिकारी नायक असलेले चित्रपट (उदा. सिंघम) दाखवून लोकांची दिशाभूल करत आहेत, त्यांना चपराक बसते !
‘सैय्यारा’ हिंदी चित्रपट पाहून चक्कर येऊन पडणार्यांनी हा चित्रपट पाहू नये !

‘काही मासांपूर्वी आलेला ‘सैय्यारा’ हा हिंदी चित्रपट भारतीय तरुणांना पुष्कळ आवडला होता. या चित्रपटात एका प्रेमी युगुलाच्या वैयक्तिक दुःखाची गोष्ट होती. तेव्हा काही तरुण-तरुणी तो चित्रपट पाहून चित्रपटगृहातच चक्कर येऊन पडले, म्हणे ! काही जणांनी सामाजिक माध्यमांवर ‘चित्रपट पाहून रडू आले’, असे लघुपट (रिल्स) प्रसारित केले. अशा आजच्या तरुणांना दंगलीच्या यातनांमध्ये होरपळलेल्या हिंदु महिलांच्या आकाशाएवढ्या दुःखाची जाणीव करून देण्याचे कार्य या चित्रपटाने केले आहे. त्यामुळे जे ‘सैय्यारा’ चित्रपट पाहून चक्कर येऊन पडले वा घाबरले असतील, त्यांनी ‘द बंगाल फाइल्स’ चित्रपट पहाण्याचे धाडस करू नये आणि स्वतःच्या दुःखाने ओथंबलेल्या चाळणीत डुबकी मारत रहावे’, असा अभिप्राय एका राष्ट्रप्रेमीने व्यक्त केली आहे.
– श्री. सागर निंबाळकर
ऊ. धर्मांध मुसलमान नेते लोकांमध्ये इस्लामचा प्रसार करत असले, तरी स्वतःच्या पत्नीला बुरख्यात ठेवत नाहीत. तिला उद्योजक बनवतात. जाहीर कार्यक्रमात टोपी आणि मुसलमानी वेश धारण करत असले, तरी घरी विदेशी पोशाख घालतात. ते स्वतःच्या मुलांची नावे तैमूरसारख्या क्रूरकर्म्यांच्या नावावरून ठेवतात, तसेच ते या मुलांना वर्ष २०५० मध्ये भारताचा पंतप्रधान बनवण्यासाठी नियोजनबद्धरित्या कार्यरत आहेत. हे वास्तव भविष्यातील धोक्याविषयी प्रेक्षकांना सावधान करते.
३. चित्रपटाची काही बलस्थाने

अ. विवेक अग्निहोत्री यांचे दिग्दर्शन हा या चित्रपटाचा आत्मा आहे. त्यांची कथा सांगण्याची पद्धत, त्याला दिलेली ‘फ्लॅशबॅक’ची (मागील प्रसंग मध्ये-मध्ये दाखवणे) जोड, प्रत्येक प्रसंग सुस्पष्ट आणि थेट मांडण्याची हातोटी आदींमुळे ३ घंटे २४ मिनिटांचा हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनावरची पकड अजिबात ढिली होऊ देत नाही. चित्रपटाच्या शेवटी घेतलेल्या भयावह प्रसंगांमुळे प्रेक्षकांना विचारप्रवृत्त करून त्यांच्यातील राष्ट्रभक्तीला संघटनाच्या आवश्यकतेची साद घालतो.
चित्रपटामुळे स्पष्ट झालेली काही सूत्रे !

१. बंगालने भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाचे योगदान दिले आहे.
२. देश म्हणजे केवळ भूमीचा तुकडा नव्हे, तर तेथील संस्कृती, कला, परंपरा याही देशाचा महत्त्वाचा भाग असतो. त्यांचे राष्ट्रांतर करणे अशक्य असते.
३. फाळणीच्या वेळी मुसलमानांसाठी पाकिस्तान दिल्यानंतर उर्वरित हिंदुस्थान हिंदूंचा होता; म्हणजे हिंदुस्थान हे ‘हिंदु राष्ट्र’ होते !
४. या चित्रपटात बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी वा बंगालचे विद्यमान शासन यांच्या विरोधात एक अवाक्षरही नाही.
– श्री. सागर निंबाळकर
आ. ८० वर्षांच्या भारती बॅनर्जी यांची भूमिका साकारणार्या पल्लवी जोशी यांचा अभिनय हे या चित्रपटाचे महत्त्वाचे बलस्थान म्हणावे लागेल. पहिल्या ३० मिनिटांत त्यांच्या तोंडी एकही संवाद नाही; मात्र केवळ डोळ्यांच्या हालचालींवरून, मुखावरील भेदरलेल्या भावांवरून ‘त्या प्रेक्षकांशी संवाद साधत आहेत’, असे वाटते. या निःशब्द संवादांचा उलगडा चित्रपटाच्या अंतापर्यंत प्रेक्षकांना होतो. शेवटच्या प्रसंगांतील त्यांची तडफड त्यांच्या कापर्या स्वरांतून स्पष्ट जाणवते.
इ. तरुण असलेल्या भारती बॅनर्जी यांची भूमिका करणार्या अभिनेत्री सिमरत कौर यांनीही कमालीची अभिनयक्षमता दर्शवली आहे. भारती यांच्या विविध मनोभूमिकांशी समरस असा अभिनय त्यांनी केला आहे.
ई. शिवा पंडित यांची भूमिका दर्शनकुमार यांनी अक्षरशः जगून दाखवली आहे. क्रूर गुलाम आणि सरदार हुसैनी यांच्या भूमिका करणारे अनुक्रमे नमाशी चक्रवर्ती अन् शाश्वत चॅटर्जी यांचा अभिनय वाखाणण्याजोगा आहे. अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती यांसारख्या कसलेल्या कलाकारांनी त्यांच्या भूमिकांना योग्य न्याय दिला आहे. सौरव दास आणि अंकित बिष्ट यांनीही चांगल्या भूमिका पार पाडल्या आहेत.
उ. या चित्रपटात एक प्रसंग दर्शवला आहे. गांधीवादाच्या विचारांनी प्रेरित असलेली भारती दंगलीच्या वेळी प्रतिकार करणार्या अमर याला म्हणते, ‘‘धर्मांध मुसलमानांनी हत्या केली. त्याचे प्रत्युत्तर म्हणून आपणही त्यांची हत्या केली, तर सगळीकडे स्मशान बनून जाईल.’’ त्यावर अमर तिला आजूबाजूची स्थिती दाखवत म्हणतो, ‘‘मग आता स्मशानाहून कोणती वेगळी स्थिती आहे ?’’ चित्रपटभर विविध प्रसंगांत अमर भारतीला जाणीव करून देतो, ‘अहिंसेचा उदोउदो करून जीव गमावण्यापेक्षा स्वसंरक्षणार्थ शस्त्र चालवणे, हे जीवनावश्यक आहे.’

४. प्रत्येक भारतियाला विनंती आणि आवाहन !
हा चित्रपट एका भारती बॅनर्जी किंवा गीता मंडल यांची कपोलकल्पित कथा नसून अशा सहस्रो हिंदु महिलांची कथा प्रातिनिधिक स्वरूपात मांडतो. ज्या भागांत आज दंगलींमध्ये हिंदू होरपळले जात आहेत किंवा जेथे हिंदूंनी पलायनवाद स्वीकारला आहे, त्यांची स्थिती जाणून घेण्यासाठी हा चित्रपट पहायलाच हवा ! यात दर्शवलेल्या भारतीय इतिहासातील चुका आणि त्याचे हिंदूंच्या जीवनावर झालेले परिणाम आपल्याला अंतर्मुख करणारे आहेत. त्यामुळे हा चित्रपट सर्वत्रचे इतिहासप्रेमी, इतिहासाचे अभ्यासक, राष्ट्रप्रेमी आणि धर्मनिष्ठ यांनी आवर्जून पाहिला पाहिजे. यासह सामान्य नागरिकांनीही देशाची सद्यःस्थिती, देशाच्या समस्यांची उगमस्थाने, त्यांवरील उपाययोजना इत्यादी जाणून घेण्यासाठी हा चित्रपट पहायला हवा !
या लेखाच्या माध्यमातून प्रत्येक भारतियाला मी हा चित्रपट पाहून राष्ट्र आणि धर्म यांसाठी संघटितपणे कार्यरत होण्याचे आवाहन करतो अन् मी माझ्या लेखणीला श्री गुरुचरणी अर्पण करतो !


‘सनातन क्रांती’ची नांदी !
छत्रपती संभाजी महाराजांचे ईश्वरनिष्ठ मन !
हिंदु धर्मरक्षणार्थ बलीदान देणारे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज !
मनुष्याचे शरीर, मन, चित्त आणि बुद्धी यांच्यावर प्रारब्धाचा असलेला प्रभाव अन् त्यांचा ग्रहांशी असलेला संबंध !
चित्रपटसृष्टीतील वलयांकित जगाच्या मोहाला न भुलता आयुष्यभर अविरतपणे नाट्यसेवा करणारे प्रामाणिक नाट्यकर्मी ६७ टक्के आध्यात्मिक पातळीचे पद्मश्री (कै.) प्रसाद सावकार !
अन्वेषणासाठी विशेष पोलीस पथक स्थापन करण्याचे तालिका अध्यक्षांचे निर्देश !