आज छत्रपती संभाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती आहे. त्या निमित्ताने…
‘छत्रपती संभाजीराजांचे ईश्वरनिष्ठ मन त्यांच्या काव्यातून प्रकट होते. शंभूराजांनी ‘बुधभूषण’ हा संस्कृत आणि ‘नायिकाभेद’, ‘नखशिख’ अन् ‘सातसतक’ हे हिंदी काव्यग्रंथ लिहिले. यातील रचनांवरून शंभूराजांची मनःस्थिती समजू शकते.

अतिप्रबल घेरे रहै आठो जाम मोही ।
दीनबंधु अब क्यों न लागत पुकारी हो ॥
सबही संकट नेवाई एक कौर ताके ।
तब जानि हो जू जब मो तन निहारिहो ॥
ज्यों भाँती हरिन कसिप को विदार्यौ उर ।
तौन भाँती कब मेरे दुष को विदारिहो ॥
अर्थ : अनेक संकटे रात्रंदिवस मला वेढून राहिली आहेत. मग हे दीनबंधू (परमेश्वरा), तुला का बरे मी हाक मारणार नाही ?
जेव्हा तू या भक्ताच्या शरिराकडे पहाशील, तेव्हाच तुला त्याचे साहाय्यक व्हावेसे वाटेल. तू जसे हिरण्यकश्यपूचे पोट फाडलेस, तसेच माझ्या दुःखाचे ही विदारण कर !

संभे कहे सुनी दीन दयाल सो । मेरी हंसी भए तेरी हंसी है ॥
अर्थ : शंभू म्हणतो, ‘हे दीनदयाळा (परमेश्वरा), माझ्या फजितीत तुझीच फजिती आहे.’
– भारताचार्य पू. (प्रा.) सु.ग. शेवडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
(साभार : ‘शंभूराजे’ या ग्रंथातून)
‘काशीविश्वनाथ सुसज्ज महामार्गा’च्या विकासाआड येणारी याचिका उत्तरप्रदेश उच्च न्यायालयाकडून असंमत !
कल्पनेद्वारे नकारात्मकतेला सकारात्मकतेमध्ये पालटणे !
व्याज ‘हराम’; पण लाभ हलाल ?
वारकरी संप्रदायातील घुसखोर ओळखा !
‘इंडो-पॅसिफिक’ क्षेत्र : २१व्या शतकातील जागतिक समृद्धी आणि सुरक्षा यांची चावी !
साधकांवर प्रीती करून त्यांना आधार देणारे आणि श्रीरामाप्रती उत्कट भाव असलेले भारताचार्य पू. प्रा. सु.ग. शेवडे (वय ९१ वर्षे) !