
अभिनेते विद्युत् जामवाल यांनी नुकतेच लोणावळा येथील ‘कैवल्यधाम योगोत्सव’ या सार्वजनिक कार्यक्रमात संपूर्ण भाषण शुद्ध आणि अस्खलित संस्कृतमध्ये केले. या कार्यक्रमात ते ‘भारतीय योगाचे राष्ट्रीय राजदूत’ म्हणून उपस्थित होते. त्यांनी भाषणात योग, भारतीय संस्कृती, सनातन परंपरा आणि युवकांचे दायित्व यांवर प्रकाश टाकला. त्यांनी शंखनाद करून मग भाषण केले. त्यांचे हे संस्कृत भाषण सामाजिक माध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाले. लोकांनी त्यांचे भारतीय संस्कृतीवरील प्रेम आणि भाषेवरील प्रभुत्व यांचे भरभरून कौतुक केले. आज जिथे संपूर्ण हिंदी चित्रपटसृष्टीवर एका विशिष्ट विचारसरणीचा पगडा आहे, जिथे चित्रपट आणि गाणी यांतून जाणीवपूर्वक ‘उर्दूकरण’ करून ‘अल्ला’, ‘मौला’ किंवा ‘सूफी’ संस्कृतीचा उदो उदो केला जातो, तिथे विद्युत् जामवाल यांनी सनातन संस्कृतीचा डंका वाजवून नवा अन् अत्यंत कौतुकास्पद पायंडा पाडला आहे.

जामवाल हे कलरीपायट्टू या प्राचीन भारतीय युद्धकलेचे जागतिक स्तरावर प्रतिनिधित्व करतात. केवळ शारीरिक शक्तीच नाही, तर आध्यात्मिक आणि मानसिक बळही तितकेच महत्त्वाचे असते, हे त्यांनी कृतीतून दाखवून दिले आहे. अनेक दशकांपासून बॉलीवूडच्या रूपेरी पडद्यावर सनातन परंपरांचे पालन करणार्याला, टिळा लावणार्याला किंवा संस्कृत बोलणार्याला जाणीवपूर्वक उपहासाचा विषय बनवून उर्दू बोलणार्या पात्रांना सुसंस्कृत दाखवण्याचा गलिच्छ छुपा अजेंडा राबवला गेला; परंतु जामवाल यांनी हिंदुविरोधी मानसिकतेच्या चिंधड्या उडवल्या. ही नव्या ‘सनातन क्रांती’ची नांदी आहे. आज ‘नासा’सारख्या जागतिक संस्थाही संस्कृतचे वैज्ञानिक महत्त्व मान्य करत असतांना भारतातील इंग्रजाळलेली पिढी मात्र तिला केवळ कर्मकांडाची भाषा समजून नाकारत आहे. अशा वेळी पाश्चात्त्य अंधानुकरणाला छेद देत आधुनिक अभिनेत्याने संस्कृतीच्या मुळांशी घट्ट राहून हे सिद्ध केले आहे की, संस्कृत हीच मानवी बुद्धीला प्रगल्भ करणारी विज्ञानाची आणि भविष्याची भाषा आहे, जिचे वैभव आता देशातील प्रत्येक हिंदु तरुणाने आत्मसात् करणे आवश्यक आहे.
स्वसंस्कृतीचा अभिमान बाळगणे म्हणजे काय, याचे जिवंत उदाहरण इतर अभिनेते आणि विशेषतः आजची भरकटलेली तरुण पिढी यांच्यासमोर विद्युत् जामवाल यांनी ठेवले आहे. जामवाल यांचे हे पाऊल केवळ एका भाषणापुरते मर्यादित न रहाता चित्रपटसृष्टीतील इतर कलाकारांनाही आत्मपरीक्षण करायला लावणारे ठरेल. जामवाल यांनी घालून दिलेल्या या आदर्शाचे देशातील कोट्यवधी तरुणांनी अनुकरण करणे आवश्यक आहे !
– सौ. अपर्णा जगताप, पुणे
छत्रपती संभाजी महाराजांचे ईश्वरनिष्ठ मन !
हिंदु धर्मरक्षणार्थ बलीदान देणारे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज !
मनुष्याचे शरीर, मन, चित्त आणि बुद्धी यांच्यावर प्रारब्धाचा असलेला प्रभाव अन् त्यांचा ग्रहांशी असलेला संबंध !
चित्रपटसृष्टीतील वलयांकित जगाच्या मोहाला न भुलता आयुष्यभर अविरतपणे नाट्यसेवा करणारे प्रामाणिक नाट्यकर्मी ६७ टक्के आध्यात्मिक पातळीचे पद्मश्री (कै.) प्रसाद सावकार !
क्रिकेटचा उदो उदो नको !
बलात्कार प्रकरणी पोलीस आणि प्रशासन यांना निर्देश देणारे झारखंड उच्च न्यायालयाचे निकालपत्र !