‘सनातन प्रभात’ने घेतला वर्षभराचा आढावा :
• बांगलादेशाच्या तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांनी बांगलादेश सोडून झाले १ वर्ष !• मुसलमानांनी १५७ मंदिरे पाडली • ४७ हिंदूंची हत्या, ३२ हिंदु महिलांवर सामूहिक बलात्कार• ५२ हिंदु शिक्षक नोकरीतून बलपूर्वक बडतर्फ • १०० हून अधिक हिंदु पोलिसांनाही नोकरीवरून काढले |
नवी देहली : बांगलादेशात तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांनी बांगलादेश सोडून भारतात केलेल्या पलायनाला १ वर्ष पूर्ण झाले आहे. गेल्या वर्षभरात तेथील हिंदूंवर सातत्याने अत्याचार होत आहेत. वर्ष १९७१ मध्ये बांगलादेशाच्या स्वातंत्र्याच्या काळात झालेल्या हिंदूंच्या नरसंहारानंतर आता प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात हिंदूंना लक्ष्य करण्यात आले. ‘सनातन प्रभात’ने गेल्या वर्षभराचा आढावा घेतला असता भयावह आकडेवारी समोर आली. ढाका येथील ‘रिसर्च अँड एम्पॉवरमेंट ऑर्गनायझेशन’चे अध्यक्ष प्रा. चंदन सरकार यांनी यासंदर्भात ‘सनातन प्रभात’ला सांगितले की, ८ ऑगस्टला महंमद युनूस हे बांगलादेशातील अंतरिम सरकारच्या प्रमुखपदी आल्यापासून ३५० दिवसांत हिंदूंवर २ सहस्र ४४७ आक्रमणे करण्यात आली. यासमवेत १५७ मंदिरांना पाडण्यात आले, ४७ हिंदूंची हत्या, ३२ हिंदु महिलांवर सामूहिक बलात्कार, तर ५२ हिंदु शिक्षकांना नोकरीतून बलपूर्वक बडतर्फ करण्यात आले. तसेच १०० हून अधिक हिंदु पोलिसांनाही नोकरीवरून काढण्यात आले. ‘सनातन प्रभात’ने गेल्या वर्षभरात बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारांच्या किमान १५० बातम्या अथवा लेख प्रकाशित केले. याचा अर्थ प्रत्येक आठवड्याला ३ बातम्या प्रकाशित करण्यात आल्या.

प्रा. सरकार यांनी सांगितले की, इस्कॉनचे चिन्मय दास प्रभु यांनी हिंदूंच्या रक्षणासाठी ‘बंगभूमी’ची मागणी केल्यानेच त्यांच्यावर कारवाई झाली. अजूनही ते कारागृहात आहेत. येथील ‘बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी’, ‘जमात-ए-इस्लामी’, बांगलादेशी सैन्य, अंतरिम सरकार, पोलीस आदींनी संगनमताने हिंदूंवर आक्रमणे केली आहेत. शेख हसीना यांचा ‘अवामी लीग’ पक्षही काही हिंदु समर्थक नाही, तर कट्टर इस्लामवादी आहे.
बांगलादेशातच स्वतंत्र ‘बंगभूमी’च्या (हिंदु राज्याज्या) स्थापनेसाठी भारताने पुढाकार घ्यावा ! – बांगलादेशातील हिंदूंची मागणी‘सनातन प्रभात’ने बांगलादेशातील विविध क्षेत्रांतील हिंदूंशी चर्चा केली असता, सर्वांनी हिंदूंच्या रक्षणासाठी ‘स्वतंत्र बंगभूमीची (हिंदु राज्याची) स्थापना करणे’, हा एकच उपाय असल्याचे सांगितला. हिंदू म्हणाले की, बांगलादेशातील सव्वादोन कोटी हिंदूंना भारतात आश्रय देणे, हे व्यावहारिकदृष्ट्या कठीण आहे. यापेक्षा बांगलादेशातच हिंदूंसाठी स्वतंत्र भूमी स्थापन करून त्यामध्ये त्यांचे पुनर्वसन झाले पाहिजे. या भूमीचे स्वामित्व भारत सरकारने स्वत:कडे घेतले पाहिजे. यासाठी भारताने बांगलादेशातील अंतर्गत राजकारणात ढवळाढवळ करणे आवश्यक आहे. भारतातील ‘चिकन नेक’जवळ असलेल्या उत्तर बांगलादेशातील ‘ठाकूरगाव-दिनाजपूर-रंगपूर जिल्ह्यांचा पट्टा’ अथवा दक्षिण-पूर्व बांगलादेशातील ‘चितगांव-कोमिला क्षेत्र’ हा भाग हिंदूंच्या स्वतंत्र राज्यासाठी निवडण्यात यावा. |
संपादकीय भूमिकाहे समस्त हिंदूंना लज्जास्पद ! भारतभरातील हिंदूंनी बांगलादेशातील त्यांच्या बांधवांसाठी आता तरी आवाज उठवला पाहिजे. यासाठी त्यांनी त्यांच्या क्षेत्रातील आमदार आणि खासदार यांच्यावर दबाव आणून बांगलादेशी हिंदूंच्या रक्षणार्थ ठोस उपाय योजण्यास सरकारला भाग पाडले पाहिजे ! |



Telangana AI Training : तेलंगाणातील काँग्रेस सरकार ८० सहस्र अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना एआय आणि डिजिटल सुरक्षा यांचे विनामूल्य प्रशिक्षण देणार !
वर्ष २०२२ मध्ये युक्रेनवर अणूबाँब टाकण्यापासून पंतप्रधान मोदी यांनी पुतिन यांना रोखले होते ! – Polish Minister
इगतपुरीतील धरणाजवळ पर्यटकांवर आक्रमण करणार्या ९ स्थानिक गुंडांना अटक !
संपादकीय : हिंदु राष्ट्राची चर्चा हवीच !
हिंदूंना शत्रूबोध नाही !
भारतातील ‘डेटा सेंटर्स’मुळे निर्माण होणारे जलसंकट !