‘प्राच्यम् स्टुडिओज’चे, म्हणजेच जगातील पहिल्या ‘हिंदु ओटीटी’चे उद्गाते आणि ‘निर्भय हिंदुत्वयोद्धा’ कॅप्टन प्रवीण चतुर्वेदी (निवृत्त) !

कॅप्टन प्रवीण के. चतुर्वेदी (निवृत्त) हे सागरी शौर्य आणि सांस्कृतिक पुनरुत्थान यांच्यामधील संगमस्थळी उभे आहेत. माजी नौकानायक आणि सध्या प्रसिद्धीमाध्यम क्षेत्रात उद्योजक असलेले चतुर्वेदी हे ‘प्राच्यम् स्टुडिओज’चे संस्थापक अन् मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. त्यांचा स्वतंत्र चित्रपट स्टुडिओ आणि भारतीय सांस्कृतिक आशयाला वाहिलेला ‘ओटीटी प्लॅॅटफॉर्म’ आहे. भारताचा इतिहास आणि वर्तमान यांच्या वादग्रस्त कथावाचन काळात चतुर्वेदी प्रभावी कथानके मांडणारे आणि ‘हिंदुत्वयोद्धा’ म्हणून उदयास आले आहेत. चित्रपट आणि डिजिटल माध्यमांद्वारे ते देशाच्या वारसाविषयीचा अभिमान पुनर्जागृत करत आहेत. हा लेख त्यांचा जीवनप्रवास, आव्हाने आणि नव्या पिढीसाठी सांस्कृतिक संवाद घडवण्यात त्यांनी केलेल्या कार्यावर प्रकाश टाकतो.

कॅप्टन प्रवीण के. चतुर्वेदी (निवृत्त)

विशेष सदर

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्यासाठी मावळे आणि शिलेदार यांनी केलेला त्याग सर्वाेच्च आहे, त्याप्रमाणे आजही अनेक हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी नागरिक धर्म-राष्ट्र यांच्या रक्षणासाठी ‘शिलेदार’ म्हणून कार्य करत आहेत. त्यांची आणि त्यांच्या हिंदु धर्मरक्षणाच्या संघर्षाची माहिती करून देणार्‍या ‘हिंदुत्वाचे शिलेदार’ या सदराद्वारे इतरांनाही प्रेरणा मिळेल. या उदाहरणांतून आपल्या मनातील चिंता दूर होऊन उत्साह निर्माण होईल ! – संपादक

१. कॅप्टन प्रवीण चतुर्वेदी (निवृत्त) यांना मिळालेली प्रेरणा आणि त्यांचा जीवनप्रवास

कॅप्टन प्रवीण चतुर्वेदी (निवृत्त) यांचे बालपण भारतीय संस्कृती आणि अध्यात्म यांत खोलवर रुजलेले होते. ते अनेकदा त्यांचे आध्यात्मिक गुरु स्वामी शिवानंद (पूर्वाश्रमीचे श्री. पंडित शिव शंकर त्रिपाठी) यांच्या मार्गदर्शनाला सर्व श्रेय देतात, ज्यांनी त्यांच्या मनात भारताचे तत्त्वज्ञान, संस्कृती, परंपरा आणि विज्ञान यांच्या विश्लेषणाची अन् संशोधनाची ओढ निर्माण केली. या संस्कारांमध्ये वाढ झाल्यामुळे सनातन धर्माविषयीची त्यांची श्रद्धा अधिक बळकट झाली आणि राष्ट्राच्या सांस्कृतिक वारशासाठी काहीतरी करण्याची प्रबळ इच्छा त्यांनी बाळगली. हीच आंतरिक प्रेरणा त्यांना एका अनपेक्षित स्थानावर घेऊन गेली. एका चित्रपट निर्मात्याच्या प्रवासाचा प्रारंभ जहाजाच्या डेकवरून झाला. कॅप्टन चतुर्वेदी (निवृत्त) यांनी मरिन अधिकारी म्हणून प्रशिक्षण घेतले आणि पुढे ते कॅप्टनपदापर्यंत पोचले. सागरी जीवनात मिळालेली शिस्त आणि व्यापक दृष्टीकोन नंतर माध्यम अन् विचारसरणी यांच्या प्रचंड लाटांमध्ये मार्ग शोधतांना पुष्कळ उपयुक्त ठरले. त्या काळातही त्यांनी मातृभूमीच्या सांस्कृतिक वारसांशी नाते कधीच तोडले नाही. ‘सनातन प्रभात प्रसारमाध्यम समूहा’सह केलेल्या एका ‘पॉडकास्ट’मध्ये त्यांनी सांगितले की, सेवेत असतांना त्यांचा चित्रपटसृष्टीशी संबंध आला आणि तिथेच दृक्-कथनाच्या कलेची त्यांना आवड निर्माण झाली. समुद्रावर असतांना चित्रपट या माध्यमाची ओळख होणे, ही विलक्षण प्रेरणा ठरली आणि त्यांच्या आयुष्याला महत्त्वाचे वळण लाभले.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याकडून ‘सनातन धर्मश्री’ पुरस्कार स्वीकारतांना कॅप्टन प्रवीण चतुर्वेदी (निवृत्त)

२. चित्रपट निर्मितीचे शिक्षण आणि ते घेण्यामागील उद्देश

एक यशस्वी सागरी कारकीर्द मागे सोडून त्यांनी अमेरिकेतील प्रतिष्ठित संस्थांमध्ये चित्रपट शिक्षणासाठी प्रवेश घेतला. त्यांनी ‘युनिव्हर्सिटी ऑफ साऊथर्न कॅलिफोर्निया’ (यू.एस्.सी.) आणि ‘युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया लॉस एंजेलिस’ (यू.सी.एल्.ए.) येथे चित्रपट निर्मितीचे शिक्षण घेतले अन् जागतिक चित्रपट उद्योगाच्या केंद्रस्थानी हे कलाशिक्षण आत्मसात केले. श्री. चतुर्वेदी यांनी केवळ शैक्षणिक ज्ञानावरच भर न देता प्रत्यक्ष उद्योगात शिरकाव केला आणि स्वतःचे कौशल्य वाढवले. त्यांनी ‘युनिव्हर्सल स्टुडिओज्’, ‘पॅरामाऊंट पिक्चर्स’ आणि ‘ट्वेंटियथ सेंच्युरी फॉक्स’ यांसारख्या मोठ्या हॉलिवूड स्टुडिओंसह काम केले. या काळात त्यांनी उद्योगातील अनेक श्रेष्ठ व्यावसायिकांशी सहकार्य करत उच्च दर्जाच्या चित्रपट निर्मितीचा थेट अनुभव घेतला. त्यांनी प्रमाणापेक्षा ‘दर्जा’ या तत्त्वाशी स्वबांधिलकी अधोरेखित केली. त्यांनी नमूद केले की, जरी ‘ऑनलाईन’ पुष्कळ सार्‍या गोष्टी उपलब्ध असल्या, तरी थोड्यांनाच पुन्हा पुन्हा पहाण्याचे खरे ‘मूल्य’ असते आणि हेच एक विशेष स्थान त्यांनी भरून काढायचे ठरवले. पश्चिमेकडील त्यांच्या काळात त्यांनी जाणले की, दृश्य दर्जाकडे जाणारा मार्ग अतिरिक्त वेळ आणि संथ प्रक्रिया यांनी भरलेला असतो; पण त्याचे परिणाम कायम गुंजत रहातात. ही जाण आणि एक धगधगते उद्दिष्ट घेऊन कॅप्टन चतुर्वेदी यांनी पुन्हा भारताकडे स्वतःचे लक्ष वळवले.

‘प्राच्यम् स्टुडिओज’चे बोधचिन्ह

३. ‘प्राच्यम् स्टुडिओज’ची निर्मिती आणि उद्देश

वर्ष २०१२ मध्ये गुरूंच्या प्रेरणेतून आणि देशभक्तीच्या भावना मनात घेऊन कॅप्टन प्रवीण चतुर्वेदी (निवृत्त) भारतात परतले. त्यांची दृष्टी स्पष्ट होती की, भारताची समृद्ध संस्कृती आणि वारसा यांविषयीच्या प्रेमासह स्वतः निर्मित केलेल्या चित्रपटांचा त्यांना संगम साधायचा होता. ‘सनातन प्रभात प्रसारमाध्यम समूहा’शी बोलतांना त्यांनी स्पष्टपणे सांगितले, ‘‘भारतीय संस्कृतीच्या माध्यमांमधून होणारे अपुरे आणि अपवित्र सादरीकरण मला प्रकर्षाने जाणवले अन् ते दुरुस्त करण्याचा मी निर्धार केला.’’ त्यांचा पहिला उपक्रम होता, ‘मूनलाईट पिक्चर्स’ या चित्रपटनिर्मिती संस्थेची स्थापना ! याद्वारे त्यांनी भारतीय विषयांवर आधारित ‘कंटेंट’ सिद्ध करायला प्रारंभ केला. या अनुभवावर आधारित पुढे त्यांनी २ तरुण कलावंतांसह ‘प्राच्यम् स्टुडिओज’ चालू केले. हा उपक्रम त्यांच्या कार्याचा पाया ठरणार होता. ‘प्राच्यम्’ हा संस्कृतमधून घेतलेला शब्द जो ‘उद्बोधक’ असे सूचित करतो. ‘प्राच्यम्’ केवळ एक निर्मितीसंस्था नव्हती. चतुर्वेदी यांनी याचे रूप एक खरेखुरे भारतीय, सनातनी माध्यम मंच म्हणून घडवले, जे त्यांनी जाणवलेल्या युरो-केंद्रित आणि हिंदुविरोधी प्रवृत्तींच्या विरोधात ठोस उत्तर ठरेल !

वर्ष २०२० पर्यंत ‘प्राच्यम्’ हे जगातील पहिले खर्‍या अर्थाने ‘हिंदु ओटीटी (ओव्हर द टॉप) स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म’ म्हणून उदयास आले. हे ‘ऑनलाईन’ चॅनेल संपूर्णपणे भारतीय संस्कृती, इतिहास, परंपरा, तत्त्वज्ञान आणि विज्ञान यांवर आधारित चित्रपट, माहितीपट अन् मालिका यांना समर्पित आहे. ‘आपल्यासाठी, आपल्याद्वारे’ या सांस्कृतिक दृष्टीकोनातून साकारलेले माध्यम आहे.

हे ही पहा –

Are Our Schools Brainwashing Hindu Students? | Shocking side of Academia

४. ‘प्राच्यम् स्टुडिओज’चे वैशिष्ट्य आणि उद्दिष्ट

‘प्राच्यम्’चे वैशिष्ट्य म्हणजे त्याची बिनधास्त भारतीय दृष्टीकोनाची बांधिलकी ! ज्या काळात जागतिक स्ट्रिमिंग आस्थापने प्रामुख्याने पाश्चात्त्य दृष्टीकोनातूनच ‘कंटेंट’ सादर करतात, त्या वेळी ‘प्राच्यम्’ने स्वतःची ओळख एक ‘कॅन्सल-प्रूफ प्लॅटफॉर्म’ म्हणून निर्माण केली. तेथे हिंदु आवाजांना सुरक्षित व्यासपीठ मिळते आणि भारतीय दृष्टीकोन मोकळेपणाने फुलू शकतो. काही वर्षांतच ‘प्राच्यम्’च्या ‘कंटेंट’ लायब्ररीत शेकडो व्हिडिओ, शॉर्ट फिल्म्स आणि मालिका समाविष्ट झाल्या, ज्यांना भारतात अन् जागतिक भारतीय (भारतीय वंशाच्या) प्रेक्षकांकडून ‘मिलियन्स’ (लाखो) ‘व्ह्यूज’ (दर्शक) मिळाले. ही भरभराट म्हणजे एक सांस्कृतिक चळवळ असून ती भारतीय दृष्टीकोनातून भारतियांसाठी जागतिक माध्यम विश्वात उठून दिसणारी आहे. ‘प्राच्यम् स्टुडिओज’चा प्रारंभ उच्च दृष्टीकोन घेऊन झाला. तो म्हणजे ‘जागतिक स्तरावर भारतीय कथानक पुन्हा उभे करणे आणि त्याला योग्य स्थान मिळवून देणे.’ त्यांचे ब्रीदवाक्यच आहे, ‘Be Unapologetic!’ (बिनधास्त आणि निर्धारपूर्वक या भूमिकेत रहा !). कॅप्टन चतुर्वेदी (निवृत्त) आणि त्यांच्या समुहाला हे स्पष्ट होते की, कथाकथनाद्वारे वापरली जाणारी ‘सॉफ्ट पॉवर’ कोणत्याही धोरणाइतकी प्रभावी ठरू शकते, विशेषतः विचारधारा आणि सामाजिक समज घडवण्यासाठी !

एका मुलाखतीत कॅप्टन चतुर्वेदी (निवृत्त) यांनी सांगितले की, ‘प्राच्यम्’ चित्रपट आणि कथाकथन यांच्या माध्यमातून भारताच्या गौरवशाली परंपरा अन् संदेश उजळवते. हे दृष्टीकोन कार्यवाहीत आणण्यासाठी त्यांनी कठोर संशोधन आणि उच्च दर्जाची निर्मितीमूल्ये यांचे यशस्वी संयोजन साधले आहे. ‘प्राच्यम्’ने विविध क्षेत्रांतील जाणकारांचा ‘इंडॉलॉजिस्ट’ (भारतीय विद्या), शास्त्रज्ञ, इतिहासकार, शिक्षणतज्ञ, पर्यावरणप्रेमी, तंत्रज्ञ, अशा तज्ञांचा संमिश्र आणि समर्पित समूह सिद्ध केला, जे त्यांच्या कंटेंटमधील तथ्यात्मक प्रामाणिकता सुनिश्चित करतात. ‘प्राच्यम्’च्या कार्याचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे की, हिंदु संस्कृतीविषयी निर्माण झालेला दीर्घकालीन अपप्रचार आणि पूर्वग्रहदूषित धारणा यांना खोडून काढणे.

५. हिंदुविरोधी कथानकांचा प्रतिवाद आणि जगातील पहिल्या ‘हिंदु ओटीटी’चा जन्म

खोलवर रूजलेल्या कथानकांच्या विरोधात उभे रहाणे, हे आव्हानाविना नसते आणि कॅप्टन चतुर्वेदी (निवृत्त) यांना वैचारिक अन् सांस्कृतिक क्षेत्रात अडथळ्यांचा सामना करावा लागला. यातील मुख्य आव्हान, म्हणजे ‘प्राच्यम्’ या स्वतंत्र प्लॅटफॉर्मची निर्मिती करण्यामध्ये मुख्यप्रवाहातील प्रसिद्धी देणार्‍या वाहिन्यांवरील ‘सेन्सॉरशिप’ (नियंत्रण) हे मोठे आव्हान होते. श्रीरामजन्मभूमी मंदिराच्या लढ्याविषयी त्यांच्या पथकाने केलेला लघुपट प्रसारित केल्यानंतर काही घंट्यांमध्ये यू ट्यूबवरून काढण्यात आला, याविषयीचा प्रसंग ते सांगतात. प्रभु श्रीरामचंद्राचे भव्य मंदिर बांधण्यासाठी रामभक्तांनी कित्येक दशकांपासून दिलेला लढा दाखवणार्‍या लघुपटाच्या चित्रफीतीचा समाजातील अनेकांनी विरोध केल्याने प्लॅटफॉर्मचे लिखाण सिद्ध करणार्‍यांचा गोंधळ उडाला. कॅप्टन चतुर्वेदी (निवृत्त) म्हणाले, ‘‘त्यांनी आमची यू ट्यूब वाहिनी बंद करण्याची धमकी दिली. अनेकांनी विनंती केल्यानंतर ही चित्रफीत पुन्हा एकदा यू ट्यूबवरून दाखवली जाऊ लागली. ही घटना डोळे उघडवणारी होती. जागतिक तांत्रिक प्लॅटफॉर्मवर हिंदूंच्या आवाजाची असुरक्षितता अधोरेखित झाली.’’ पक्षपातीपणे तक्रारी प्रविष्ट केल्यानंतर प्रस्थापित कथानकांविरुद्धची आव्हाने थांबवता येऊ शकतात. या अपयशामुळे खचून न जाता कॅप्टन चतुर्वेदी (निवृत्त) आणि त्यांचे सहकारी यांना आत्मनिर्भर होण्याची प्रेरणा मिळाली. यू ट्यूबने घातलेल्या बंदीनंतर ‘हिंदु ओटीटी’ प्लॅटफॉर्मची संकल्पना समोर आली. चतुर्वेदी यांच्या शब्दांमध्ये ‘प्राच्यम्’मुळे हिंदूंना त्यांचा स्वतःचा आवाज मिळाला, ज्यामध्ये कुणीही अडथळा आणू शकत नव्हते. तरीही स्वतंत्रपणे प्लॅटफॉर्म चालवणे, हेही आव्हान होते. उच्च दर्जाच्या लिखाणाची निर्मिती करण्यासाठी आणि त्याच्या प्रसारणासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यात आर्थिक व्यय मोठा होता. मुख्य प्रवाहातील प्रसारण करणारे आणि ‘ओटीटी’ यांच्याकडे मोठ्या प्रमाणात स्रोत असतात.

कॅप्टन चतुर्वेदी (निवृत्त) यांनी समाजातील लोकांना याविषयी आवाहन केले. ‘प्राच्यम्’ हा ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर चालणारा न्यास असून त्याच्या कार्यासाठी दर्शकांना देणगी किंवा वर्गणी देण्यासाठी आवाहन करतो. काही वर्षांमध्ये या प्लॅटफॉर्म बघणार्‍यांची संख्या जलदगतीने वाढली. यामुळे यू ट्यूब किंवा इन्स्टाग्राम यांवर ‘प्राच्यम्’ची चित्रफित दाखवण्यास अडखळणार्‍यांना या प्लॅटफॉर्मवरून चित्रफीत पाठवणे सोपे झाले. या प्लॅटफॉर्मवरून प्रसारित केलेला प्रत्येक माहितीपट किंवा पॉडकास्ट यांची नवीन वर्गणीदारांची संख्या वाढत आहे. त्यामुळे जाणीव असलेल्या वाचकांचे जाळे वाढत आहे. याचा परिणाम नुसते पहाण्याच्या पलीकडे होत आहे. या प्लॅटफॉर्म दर्शकांना त्यांच्या ओळखीसह कृतीशील सहभागी होण्यासाठी प्रवृत्त करत आहे. सुदैवाने कॅप्टन चतुर्वेदी (निवृत्त) यांचे असामान्य खोलवर संशोधन असलेला भारताशी संबंधित लिखाण पाहून ‘सनातन प्रभात प्रसारमाध्यम समूह’ त्यांच्या संपर्कात आले. कालांतराने ‘जागतिक संवादाच्या दृष्टीने भारतीय संस्कृतीची प्रशंसा करण्यास ‘प्राच्यम्’ अधिक प्रोत्साहन देऊ शकेल’, अशा प्रकारचे लिखाण सिद्ध करणार्‍यांची ‘इकोसिस्टम’ (यंत्रणा) सिद्ध करण्यामध्ये कॅप्टन चतुर्वेदी (निवृत्त) यांचा प्रभाव आहे.

‘प्राच्यम्’ने मिळवलेले यश पाहून भारताविषयी इतर स्वतंत्रपणे काम करणारे चित्रपट निर्माते आणि यू ट्यूबर्स यांना त्यांचे प्रकल्प करण्यास उत्साह आला. त्यांच्यापैकी काहींनी ‘प्राच्यम्’शी भागीदारी केली किंवा काहींनी कॅप्टन चतुर्वेदी (निवृत्त) यांच्या पथकाचे मार्गदर्शन घेतले. सारांश म्हणजे राष्ट्रीय प्रवाहामध्ये पर्यायी प्रसारमाध्यमांना वैध ठरवण्यामध्ये कॅप्टन चतुर्वेदी (निवृत्त) यांनी साहाय्य केले आहे. यातून स्वतःचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी एखाद्याने परंपरागत स्टुडिओ किंवा वाहिन्या यांवर विसंबून रहाण्याची आवश्यकता नाही, हे त्यांनी सिद्ध केले. हे काही विशिष्ट कारणाच्या सेवेसाठी लिखाणनिर्मितीचे लोकशाहीकरण करणे, हा टिकून रहाणारा वारसा कॅप्टन चतुर्वेदी (निवृत्त) यांनी निर्माण केला.

हिंदु संस्कृती पुनर्जीवित करण्यासाठीचे योगदान

कॅप्टन प्रवीण चतुर्वेदी (निवृत्त) यांचे हिंदु संस्कृती पुनर्जीवित करण्याचे योगदान शब्दांच्या पलीकडे आहे. ते लिखाणाची निर्मिती आणि समाजाची उभारणी करण्याची कृती करत आहेत. हिंदुत्वाविषयी विचार करणार्‍यांचे गट आणि चळवळी यांमध्ये त्यांचा कृतीशील सहभाग असतो. जुलै २०२४ मध्ये गोवा येथील वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव या प्रमुख संमेलनामध्ये कॅप्टन चतुर्वेदी (निवृत्त) यांनी भाषणातून ‘हिंदूंनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे’, हा विषय तळमळीने मांडला.

कॅप्टन प्रवीण चतुर्वेदी (निवृत्त)

ते म्हणाले,

‘‘हिंदु धर्मावर होणार्‍या जागतिक आक्रमणाचा सामना करण्यासाठी धार्मिकता आणि आध्यात्मिकता यांचा मिलाफ करून संघटितपणे त्याला सामोरे गेले पाहिजे.’’ त्यांच्या या शब्दांवरून ‘राजकीय आणि सांस्कृतिक पुनर्जीवितता हे एकाच वेळी साध्य केले पाहिजे’, हे अधोरेखित होते, म्हणजे ‘अध्यात्माविषयीची कृती, धार्मिक विधी आणि भक्ती या माध्यमातून निर्माण झालेली आध्यात्मिक शक्ती ही धार्मिक सभ्यतेचे पुनर्जीवन करण्यासाठी सामाजिक कृतीएवढीच महत्त्वाची आहे. समाजात पालट होण्यासाठी वैयक्तिक साधना हा पाया आहे’, यावर त्यांनी भर दिला. ते म्हणतात, ‘प्राच्यम्मधील प्रत्येक व्यक्ती साधक आहे.’ ते स्वतः भगवान शिवाच्या दिशेने जाणार्‍या ‘अघोरी’ मार्गाची साधना करतात. त्यांच्या दृष्टीकोनामध्ये आध्यात्मिकता आणि राष्ट्रवाद यांची छाप आहे. धर्मनिष्ठता आणि आधुनिकता यांमध्ये किंवा परंपरांना पाठिंबा देणे अन् आधुनिकेतला चिकटून रहाणे यांमध्ये विभाजन करत नाहीत.

६. भारतीय संस्कृती सर्वसमावेशक असल्याचे दर्शवण्यासाठी केलेले विविध प्रयत्न

शतकभरापासून विशेषतः वसाहती आणि त्यानंतरच्या काळात भारतीय संस्कृतीला मागासलेली किंवा अनुकरण करणारी म्हणून दाखवण्याचा प्रयत्न झाला आहे. कॅप्टन चतुर्वेदी (निवृत्त) यांनी या  चुकीच्या दृष्टीकोनाला तथ्याधारित कथनांनी पालटण्याचा निर्धार केला. ‘प्राच्यम्’च्या अंतर्गत घोषित झालेला एक महत्त्वाकांक्षी उपक्रम, म्हणजे ‘१० इंडिक फिल्म्स’ ही माहितीपट मालिका ! या मालिकेत ‘आर्यन इन्व्हेन्शन थिअरी’पासून महाभारत आणि रामायण यांसारख्या महाकाव्यांच्या वैज्ञानिक कालनिर्धारणापर्यंत, तसेच प्राचीन भारतीय ज्ञानाच्या जागतिक योगदानांपर्यंत अनेक विषयांचा समावेश आहे. या प्रत्येक चित्रपटाचे उद्दिष्ट आहे की, एका मिथकाचे खंडण करणे किंवा भारतीय वारशाचा दुर्लक्षित पैलू अधोरेखित करणे, त्यामुळे संशोधनातील दरी भरून काढणे आणि भारतविरोधी लॉबीजच्या उंचावलेल्या कथा-प्रपंचाला प्रभावी उत्तर देणे.

कठोर संशोधन आणि दर्जेदार सिनेमॅटिक कथन यांवर गुंतवणूक करून कॅप्टन चतुर्वेदी (निवृत्त) हे प्रेक्षकांना असे कंटेंट देऊ इच्छितात, जे केवळ माहितीपूर्ण नसेल, तर त्यांच्यात आधुनिक काळात चालू असलेल्या वैचारिक संघर्षात सक्रीय भाग घेण्याचा आत्मविश्वासही निर्माण करील.

Hindu Resurgence to Hindu Rashtra | Ft. @Prachyam CEO Praveen Chaturvedi | Sanatan Prabhat Podcast

माहितीपटांच्या पलीकडेही कॅप्टन चतुर्वेदी (निवृत्त) यांच्या नेतृत्वाखाली ‘प्राच्यम् स्टुडिओज’ विविध प्रकारचा कंटेंट सिद्ध करत आहे, जो हिंदु सांस्कृतिक पुनर्जागरणाला चालना देतो. त्यातील एक उल्लेखनीय उपक्रम, म्हणजे ‘द चेंजमेकर्स’ – एक पॉडकास्ट आणि व्हिडिओ मुलाखत मालिका, ज्यात कॅप्टन चतुर्वेदी (निवृत्त) स्वतः सूत्रसंचालकाची भूमिका बजावतात. या मालिकेत ते प्रभावशाली विचारवंत, कार्यकर्ते आणि आध्यात्मिक नेते यांच्याशी संवाद साधतात, उदा. त्यांनी ‘वर्ल्ड हिंदु फाऊंडेशन’चे संस्थापक स्वामी विज्ञानानंद यांच्याशी संवाद साधत ‘हिंदु ‘मॅनिफेस्टो’ (घोषणापत्र) आणि हिंदु राष्ट्राची रूपरेषा’ यांवर चर्चा केली.

जून २०२४ मध्ये कॅप्टन प्रवीण चतुर्वेदी (निवृत्त) यांचा ‘पॉडकास्ट’ (मुलाखत) घेतल्यानंतर त्यांना ‘सनातन प्रभात’चा अंक भेट देतांना सनातन प्रभात प्रसारमाध्यम समूहाचे संपादक श्री. योगेश जलतारे (डावीकडील)

दुसर्‍या एका अलीकडील भागात त्यांनी लेखक श्री. राजीव मल्होत्रा यांच्याशी संवाद साधून ‘हिंदु धर्मावरील लपवलेले युद्ध’ या विषयावर चर्चा केली. त्यात त्यांनी शिक्षण आणि माध्यमांचे क्षेत्र यांत चालू असलेल्या बौद्धिक संघर्षाचा वेध घेतला आहे.

अशा प्रकारच्या कंटेंटद्वारे चतुर्वेदी आणि त्यांचा समूह केवळ माहितीपट निर्माण करत नाही, तर हिंदु विचारांचे समर्थन करणार्‍या विविध आवाजांसाठी मुक्त व्यासपीठही उभे करत आहेत. संवाद, मुलाखती आणि चित्रपटे यांच्या माध्यमातून भारताची सांस्कृतिक अस्मिता अन् सातत्याची एक सुसंगत, तसेच गर्वाने सांगणारी कथा उभी करण्याचा हा एक सर्वसमावेशक प्रयत्न आहे.

७. पुढील वाटचाल

खोल समुद्रातून ते सांस्कृतिक पुनर्जागरण हा कॅप्टन चतुर्वेदी (निवृत्त) यांचा प्रवास हा दूरदर्शीपणा आणि विश्वास यांचा पुरावा आहे. त्यांच्यामध्ये नौदल अधिकार्‍याची शिस्त, चित्रपट निर्मात्याची सृजनशीलता आणि हिंदु संस्कृतीच्या धर्मयोद्ध्याचा उत्साह या गुणांचा समावेश आहे. ‘प्राच्यम् स्टुडिओ’च्या माध्यमातून त्यांनी केवळ चित्रपट सिद्ध करणारा प्लॅटफार्म निर्माण न करता भारताचा खरा इतिहास भारतियांकडून अभिमानाने आणि अचूकतेने सांगितला जाऊ शकतो, ही आशा निर्माण केली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली ‘प्राच्यम्’ हा केवळ स्टुडिओ न होता चळवळ ठरली आहे. यामुळे कथानकांविरुद्धचे युद्धाचे रूपांतर ही भारतीय संस्कृती पुनर्जीवित होण्यामध्ये होत आहे. त्यांच्या अलीकडच्या वक्तव्यामध्ये कॅप्टन चतुर्वेदी (निवृत्त) यांनी त्यांच्या मोहिमेविषयी ‘भारतीय ओळख सिद्ध करणे, ही अभिमानाची गोष्ट आहे’, असे म्हटले आहे. या मोहिमेमध्ये हिंदुविरोधी वादळे, भारताच्या विरोधातील आधुनिक प्रसारमाध्यमे यांचा प्रभाव असतांना हिंदु संस्कृतीला पुनर्जीवित करून पालट घडवणारी नौका ते चालवत आहेत आणि भारतीय कथानकांवर पुन्हा हक्क सांगण्याच्या या प्रवासात इतरांना सहभागी होण्याची स्फूर्ती देत आहेत. केवळ ‘सनातन प्रभात’च्या नजरेत नव्हे, तर प्रत्येक भारतीय हिंदूच्या दृष्टीने कॅप्टन प्रवीण चतुर्वेदी (निवृत्त) हे ‘निर्भय हिंदुत्वयोद्धा’ आहेत.

🪷हिंदुत्वाचे शिलेदार या सदरामध्ये प्रसिद्ध होणाऱ्या मान्यवरांची माहिती वाचण्यासाठी इथे क्लिक करा !🪷