मोहरमच्या मिरवणुकीत सहस्रो लोकांना ठार मारण्याच्या कारस्थानामागील समाजविघातक प्रवृत्ती !

१. मुंबईत मोहरमच्या वेळी विषारी गोळ्यांच्या वाटपातून सहस्रो लोकांना मारण्याचे कारस्थान उघड

‘जून मासात मोहरम साजरा झाला. त्या निमित्ताने मुंबईत निघालेल्या मिरवणुकीत अनुमाने ३ लाख लोक सहभागी झाले होते. या मिरवणुकीत इमाम हुसेन यांच्या स्मरणार्थ फैय्याज नावाच्या धर्मांधाने उंदीर मारण्याच्या गोळ्या (कॅप्सुल) वाटल्या. त्या गोळ्यांचे सेवन केल्यानंतर दोघा-तिघांची प्रकृत बिघडली आणि त्यांना तातडीने रुग्णालयात भरती करावे लागले. तो या मिरवणुकीत १५ सहस्र गोळ्या वाटणार होता. त्यामुळे तेवढ्या व्यक्ती पीडित झाल्या असत्या आणि प्रचंड मोठी दुर्घटना घडली असती. साहजिकच त्याचा पहिला संशय हिंदूंवर घेतला गेला असता. त्यानंतर दोन समाजात दंगल होऊन सार्वजनिक सुरक्षा धोक्यात आली असती. आरोपी हा वेदनाशामक गोळ्या असल्याचे भासवून त्यांचे वितरण करत होता; परंतु त्याच्या बाटलीवर वेगळच लेबल दिसले. या प्रसंगातून धर्मांधांची दुसर्‍यांचा जीव घेण्याची भयावह प्रवृत्ती दिसून येते. सुदैवाने मुंबईत मोठा नरसंहार टळला, असे म्हणावे लागेल.

पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी

२. समाजविघातक प्रवृत्ती संपवण्यासाठी सरकारचे ‘झिरो टॉलरन्स’ धोरण

सध्या केंद्र सरकारसह अनेक राज्य सरकारे ‘झिरो टॉलरन्स’ (शून्य सहिष्णुता) हे तत्त्व कार्यवाहीत आणत आहेत. त्यामुळे एवढा मोठा विषय ते सहजपणे सोडून देणार नाहीत. निश्चितपणे ते त्याच्या मुळाशी जाऊन शोध घेतील. फैय्याज नावाच्या व्यक्तीवर फौजदारी गुन्हा नोंदवण्यात आला असून त्याला त्याच दिवशी पोलिसांनी कह्यात घेतले. त्याने काही गोष्टी मान्य केल्या आहेत. तो वितरित करत असलेल्या प्रत्येक कॅप्सुलमध्ये १ ग्रॅम ‘झिंक फॉस्फाईड’ होते. हे औषध उंदीर मारण्यासाठी वापरले जाते. तो इराक-इराण या देशांमध्ये राहून आला आहे. त्यामुळे या घटनेत विदेशी शक्तींचा हात आहे का ? याचे अन्वेषण पोलिसांनी करणे आवश्यक आहे. अशा प्रकारचे आतंकवादी कृत्य किंवा कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात घालणारी षड्यंत्रे हाणून पाडली पाहिजेत. या प्रकरणाविषयी सातत्याने धर्मांधांची बाजू घेणारे पुरोगामी, साम्यवादी आणि विरोधी चकार शब्दही बोलणार नाहीत. त्यांची ही दुष्प्रवृत्तीही हिंदूंनी लक्षात घेतली पाहिजे. दुसर्‍यांच्या जिवावर उठण्याचे अशा प्रकारचे शिक्षण धर्मांधांना मिळत असते का ? याचाही विचार होणे आवश्यक आहे.’

श्रीकृष्णार्पणमस्तु ।

– (पू.) अधिवक्ता सुरेश कुलकर्णी, मुंबई उच्च न्यायालय (४.७.२०२६)