भारताच्या वैचारिक विध्वंसाचा स्वातंत्र्योत्तर इतिहास ! – (भाग ५)

स्वातंत्र्यानंतर उदयास आलेल्या आणि लोकशाही स्वीकारलेल्या भारताचा गेल्या ७५ वर्षांचा वस्तूनिष्ठ इतिहास ‘हिंदु जगा’समोर अभावानेच कुणी मांडला असेल. हा इतिहास हिंदूंना लक्षात आला असता, तर त्यांच्यावर होत असलेला अन्याय नि अत्याचार यांविरोधात ते संघटितपणे उभे राहिले असते; परंतु आपल्या संपूर्ण व्यवस्थेने ते कधीच त्यांना कळू होऊ दिले नाही. यामागे केवळ राष्ट्रीयच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय षड्यंत्र कार्यरत राहिले आहे. हे ‘प्राच्यम् स्टुडिओज’ने प्रसारित केलेल्या व्हिडिओतून अत्यंत सुरेखपणे सांगण्यात आले आहे. ‘प्राच्यम् स्टुडिओज’चे प्रमुख कॅप्टन प्रवीण चतुर्वेदी यांच्या विशेष सौजन्याने या व्हिडिओची संहिता आमच्या वाचकांसाठी प्रकाशित करत आहोत.

याचा चौथा भाग आपण २४ मार्च या दिवशीच्या अंकात वाचला. त्यामध्ये ‘परमिट राज’मुळे भ्रष्टाचारात वाढ, नेहरूंचे भारतीय संस्कृतीकडे दुर्लक्ष आणि पाश्चात्त्य संस्कृतीचे उदात्तीकरण, वर्ष १९९१ च्या आर्थिक क्रांतीपासून भारताच्या नव्या दुर्दैवी अध्यायाला प्रारंभ आदी सूत्रे पाहिली. आज या लेखाचा शेवटचा भाग पाहूया.

(prachyam.com वर हा व्हिडिओ हिंदू पाहू शकतात. या व्हिडिओचे नाव आहे – ‘साहेब’ जे कधी गेलेच नाहीत : भाग २ – परिणाम.’ भाग-१ मधून स्वातंत्र्याच्या आधी १००० वर्षांचा हिंदुद्वेषी इतिहास दाखवण्यात आला आहे. त्याचा लेख एप्रिल २०२३ मध्ये ‘सनातन प्रभात’मध्ये प्रकाशित करण्यात आला होता.) (भाग ५)

मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा :https://sanatanprabhat.org/marathi/776923.html

२७. भारताला नियंत्रणात ठेवण्याचा विदेशी शक्तींचा प्रयत्न !

या जागतिक वसाहतीच्या महासागरात विरघळलेले ‘बँकिंग’, ‘बिग फार्मा’ (औषध आस्थापने), संरक्षण आणि अन्न माफिया यांचे आर्थिक ‘हिटमॅन’ (भारतविरोधी कारवायांसाठी पैसा पुरवणारे अब्जाधीश जॉर्ज सोरोस यांची ‘सोरोस फाऊंडेशन’ यांसारखी आस्थापने) ‘साहेबां’च्या (काही प्रशासकीय अधिकारी आणि काही राजकीय पक्ष/नेते यांच्या) माध्यमातून आपल्या देशाचे भवितव्य आणि त्याचा प्रवास निर्धारित करतात. (या साहेबांची काही उदाहरणे पुढीलप्रमाणे – प्रसिद्ध अर्थतज्ञ आणि रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन, काँग्रेसचे राहुल गांधी, अमेरिकेतील हिंदुद्वेष्टे प्राध्यापक शेल्डन पोलॉक आदी.) ठीक तसेच, जसे १९ व्या शतकात इंग्रजांनी (राजा राम मोहन रॉय यांच्या माध्यमातून) केले होते. शेवटी बंगाल जिंकण्याआधी ब्रिटीश केवळ ‘एफ्.डी.आय.’ कंपनी (भारतात विदेशी गुंतवणूक करणारे आस्थापन) तर होती, ज्याच्या ‘स्टॉक्स’चे मालक इंग्लंडमध्ये बसले होते. एकूणच काय, तर ‘साहेब’ त्या सर्वांची (उदा. पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आदींची)  मानहानी करतात, जे या कटात भाग घेण्यास नकार देतात. (याची काही उदाहरणे खाली दिली आहेत.)

भारतीय पत्रकार करण थापर हे अमर्त्य सेन यांना विचारतात, ‘काळा पैसा संपवणे, हा नोटाबंदीचा उद्देश होता. हा शहाणपणाचा निर्णय होता का ?’ सेन सांगतात, ‘हा निश्चितच शहाणपणाचा निर्णय नव्हता आणि होय, ती एक चूक होती !’

प्रसिद्ध वैज्ञानिक आणि लेखक श्री. आनंद रंगनाथन् सांगतात, ‘पूर्णपणे कायदेशीर असलेले तीन कृषी कायदे जे काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांच्या घोषणापत्रात होते, तेच पंतप्रधान मोदी यांनी आणले. अचानक या कृषी कायद्यांची वकिली करणार्‍या सर्व राजकीय पक्षांनी पलटी मारली. काय झाले ते तुम्ही पाहिले ! त्यांना विरोध करण्यासाठी त्यांनी काही प्रथितयश कलाकारांना पैसे दिले. (उदा. हॉलीवूड अभिनेत्री रिहान्ना, कथित पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्ग आदी.)’’ जेव्हा जेव्हा तुम्ही तुमच्या समस्या स्वतः सोडवायला जाल, तेव्हा हे ‘बाबू’, हे ‘साहेब’ किंवा विदेशी अप्रसन्न होतील. ते म्हणतील, ‘‘अरे देवा, परत एक राष्ट्रवादी !

आंतरराष्ट्रीय व्यवहारतज्ञ श्री. रुचिर शर्मा सांगतात, ‘पाश्चात्त्य देशांना भारताचा राष्ट्रवाद इतका घृणास्पद वाटतो; कारण त्यांच्या राज्यव्यवस्थेच्या संरचनेत ‘राष्ट्रवादाची अतिशयोक्ती’ (हायपर नॅशनॅलझिम्) आधीपासूनच कठोरपणे नमूद आहे. त्यामुळे ते म्हणू शकतात की, ‘मी राष्ट्र्रवादी नाही. मी स्वातंत्र्यात रहातो; कारण माझे राज्य माझ्या वतीने अतीराष्ट्र्रवादी आहे.’ इतिहासकार प्रा. कपिल कुमार सांगतात, ‘जगातील या तथाकथित लोकशाहीवादी (पश्चिमी) देशांनी दुसर्‍या देशांमध्ये सैनिकी राजवट आणि हुकूमशाही यांचे समर्थन केले आहे. तरीही ते उदारमतवाद आणि लोकशाही यांचा ‘टॅग’ घेऊन चालतात !’

जेव्हा अयोध्येत हिंदूंनी इस्लामी वसाहतवादाचे ‘खंडहर’  (बाबरी ढाचा) पाडले, तेव्हा महान विचारवंत धर्मपाल यांना किरकोळच आनंद वाटला.  तेव्हाच भारताचे ‘मन’ खर्‍या अर्थाने स्वतंत्र होईल. मानसोपचारतज्ञ फ्रँट्झ फनोन याने सांगितले आहे की, जर ते हिंसक नसेल, तर ते खरे ‘निर्वसाहतीकरण’ (डी-कोलोनायझेशन) नव्हे.

सोव्हिएत संघाचा व्यावसायिक प्रचार करणारे बेझमेनोव्ह सांगतात, ‘मोहेंजोदडो, इजिप्त, मयान, इंकास यांसारख्या संस्कृती कोसळल्या. ज्याक्षणी त्यांनी त्यांचा ‘धर्म’ गमावला, त्यातच त्या विघटित झाल्या. काहीतरी अशी गोष्ट जी भौतिक नाही, ती समाजाला पुढे नेते आणि त्याला जिवंत रहाण्यासाठी साहाय्य करते. याउलट ज्या क्षणी आपण ‘दोन अधिक दोन म्हणजे चार’वरच विश्वास ठेवू लागतो (विज्ञानाचा पुरस्कार करू लागतो) आणि तेच आपले जीवन अन् अस्तित्व यांचे मार्गदर्शक तत्त्व बनवतो, त्या क्षणी आपण मरतो.’

२८. इतिहास कधीच नष्ट केला जाऊ शकत नाही !

बेझमेनोव्ह पुढे सांगतात, ‘त्यामुळे ‘अनैतिकीकरणा’ची प्रक्रिया तेव्हाच थांबवता येईल, जेव्हा आपण समाजाला धर्माकडे परत नेऊ. एकूणच वैचारिक विध्वंसाचे उत्तर, विचित्र वाटेल; पण अगदी सोपे आहे. त्याला थेट विरोध करू नका. आपल्या आत्मीयतेच्या आणि नैतिक श्रेष्ठतेच्या जोराने त्यावर प्रहार करा ! जर तुमच्याकडे ती शक्ती नसेल, तर ती विकसित करण्याची वेळ आली आहे आणि तेच त्यावरील एकमात्र उत्तर आहे. ज्या गोष्टींपासून ते तुम्हाला दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत, तीच तुमची शक्ती होय. महान ग्रंथ जे आपल्या जीवनाला खरा आधार देऊ शकतात; असे ज्ञान जे जीवनाचे अंतिम ध्येय साध्य करण्याच्या दिशेने घेऊन जाते, त्याकडे आपल्याला पहावे लागेल. यासमवेतच त्या चुकाही समजून घेतल्या पाहिजेत, ज्यांच्यामुळे भारतातील लोकांमध्ये शत्रूबोध (कोण शत्रू आहे, याचे ज्ञान) संपला. एक अमेरिकी मुलगा ज्याला नागासाकीवर करण्यात आलेल्या त्याच्या पूर्वजांच्या पापांविषयी सांगितले गेले नाही, हे तर समजू शकतो; पण एक जपानी मुलगा जर मोठा झाल्यानंतर जपानहून अधिक अमेरिकेवर प्रेम करत असेल, तर ही कसली विडंबना ?  इतिहासकार प्रा. कपिल कुमार सांगतात, ‘इतिहासाचे विकृतीकरण करता येते, इतिहास दडपता येतो, इतिहासाचा विपर्यासही होऊ शकतो; पण इतिहास कधीच नष्ट केला जाऊ शकत नाही !’

२९. वेळीच जागृत होऊन हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रयत्न करणे आवश्यक !

काही ठोस पावले उचलण्याची वेळ आली आहे. त्यांच्या ‘नोबेल’, ‘प्रेस रँकिंग्ज’ आणि निर्देशांक यांच्या पलीकडे दिसेल की, ही जी (देशाची) अस्थिरता आहे, ती केवळ एक लक्षण आहे, – एखाद्या तापासारखी ! खरा आजार ‘ग्लोबल फायनॅन्शियल डीप-स्टेट’ (जागतिक आर्थिक देशविरोधी षड्यंत्र) हा आहे. साहेब त्यांचे विषाणू आहेत. ते प्रतिदिन नवीन रूपे घेऊन नवीन ‘व्हेरिएन्ट्स’सारखे येतील.  युरी बेझमेनोव्ह म्हणतात, ‘तुमच्या आजूबाजूला काय चालले आहे, ते समजून घ्या ! तुम्ही शांततेच्या काळात जगत नाही आहात. तुम्ही युद्धजन्य स्थितीत आहात आणि स्वतःला वाचवण्यासाठी तुमच्याकडे फार अल्प वेळ आहे. जरी तुम्ही आता आणि या क्षणी नव्या पिढीला शिकवायला प्रारंभ केला, तरी परिस्थिती पालटण्यासाठी तुम्हाला १५-२० वर्षे लागतील.’

जेव्हा जेव्हा साहेब, जे कधी गेलेच नाहीत, ते बोलायला लागतात की, ‘देशात भीतीचे वातावरण आहे’, तर समजून घ्या की, राष्ट्राची प्रतिरक्षण प्रणाली उभी होत आहे, कदाचित् कुणा चक्रवर्ती सम्राटाच्या आगमनाची चाहूल येत असावी. आपल्या सहस्रो वर्षांच्या इतिहासात, जेव्हा जेव्हा चक्रवर्ती सम्राटांनी या पुण्यभूमीवर जन्म घेतला, तेव्हा तेव्हा या साहेबांनी पळ काढला आहे, हे लक्षात ठेवा ! असे साहेब नेहमीच देश सोडून गेले आहेत !

(समाप्त)

(साभार : ‘प्राच्यम्’ हिंदु ओटीटी)